अ .भा.वि.प कडून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन : काय आहे कारण..?

ओंकार धर्माधिकारी
Monday, 7 September 2020

शैक्षणिक शुल्कात ३० टक्के कपात करा
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी.

कोल्हापूर : कोरोनामुळे बहुतांशी कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ च्य शैक्षणिक शुल्कात ३० टक्के कपात करा. तसेच परीक्षा शुल्क माफ करा. या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य द्वारावर आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधी घोषणा देत त्यांनी सरकारच्या पुतळ्याचे दहन केले.

 आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी कुलसचिव डॉ.विलास नंडवडेकर यांना दिले. निवेदनातील माहितीनुसार, कोरोनामुळे देशात मोठे आर्थिक संकट उभे राहिले. बहुतांशी कंपन्यांनी पगार कपात केली.  उद्योगधंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत पालकांना संपूर्ण शुल्क भरणे अवघड आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमाचे २०२०-२०२१ चे शुल्क ३० टक्यानी कमी करावे. परीक्षा शुल्क माफ करावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा- माजी खासदार धनंजय महाडिकांसाठी आजही तो नंबर ठरतोय हिट

या आंदोलनात महानगर मंत्री ऋषिकेश माळी, सहमंत्री अथर्व स्वामी, तालुकाप्रमुख सोहम कुराडे, अद्वैत पत्की, रेवती पाटील, ऋतुजा माळी, पूर्वा मोहिते, समृद्धी उपाध्ये यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad 30% reduction in tuition fees