हाॅटेल व्यवसायिकांनी सरकारकडे केलीय 'ही' मागणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सरकारने कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेऊन, हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांन मधून जोर धरू लागली आहे.

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. हॉटेलचे भाडे, कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते अशा अनेक समस्या व्यवसायिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे सरकारने कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेऊन, हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांन मधून जोर धरू लागली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे. खबरदारी म्हणून सरकारने शाळा, मॉल, सभागृह, चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम आदींवर बंदी आणली आहे. तसेच हॉटेलमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे हॉटेलमधून देखील कोरोनाचा संसर्ग पसरू शकण्याच्या भितीने हॉटेल बंद केली. गेली दोन महिने हॉटेल बंद असल्याने व्यवसायिकांची आर्थिक उलाढाल पूर्णतः ठप्प झाली आहे. हॉटेल बंद असले तरी मोठ्या प्रमाणात कर्मचारी हॉटेलमध्येच थांबून, त्याची सर्व जबाबदारी हॉटेल मालकांवर आहे. तसेच हॉटेलचे भाडे, कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते अशी देणी ही भागवावी लागत आहेत. त्यामुळे व्यवसाय बंद व खर्च सुरू असे चित्र हॉटेल व्यवसायात पहायला मिळत आहे. 
कोरोना संकटाचा कालावधी नेमका किती असणार याबाबत कोणीही ठाम सांगू शकत नाही. त्यामुळे कोरोनाच्या धास्तीने हॉटेल बंद ठेवण्याऐवजी, संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेत नियमावली तयार करून, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी हॉटेल मालकांकडून होत आहे. 

हे पण वाचा -  तो कर्नाटकातला, ती महाराष्ट्रातली, लग्न करुन त्यांनी संसार थाटला पण...

हॉटेलमध्ये चमचमीत व चवीष्ट पदार्थाची चव चाखण्यासाठी ग्राहक जातो. पदार्थाची चव सततच्या सरावाने कायम राहते ; मात्र गेल्या दोन महिन्यापासून हॉटेल बंद असल्याने पदार्थाच्या चवीत बदल होण्याची भिती हॉटेल व्यावसायीकांमधून व्यक्त होत आहे.

हे पण वाचा -  'ते' मुंबईतील रेड झोन मधून गावात आले, सोबत आणलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले अन् झाले गायब... 

 

हॉटेलचे भाडे, कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते अशा अनेक समस्या हॉटेल व्यवसायिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे सरकारने हॉटेल व्यवसायिकांना मदत करावी.

-बाळासाहेब गद्रे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मद्य खाद्य व्यावसायीक असोसीएशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to the government to start a hotel business