जगात कोरोनाचे अन् बेळगावात 'या' भयानक आजाराचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

गेल्या रविवारी विष्णू गल्ली वडगाव येथील 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा डेंगीने मृत्यू झाला होता.

बेळगाव : शहरात दिवसेंदिवस कोरोनाची भिती वाढत असतानाच शहरात डेंगीच्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नाथ पै सर्कल येथील चांभार वाडा येथे 11 जणांना डेंगीची लागन झाली आहे. तरीही आरोग्य विभाग आणि महानगरपालिका सुस्त असल्याने महानगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याच्या भावना  येथील नागरिकांमधून व्यक्‍त होत आहेत.

गेल्या रविवारी विष्णू गल्ली वडगाव येथील 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा डेंगीने मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालीका व आरोग्य विभाग खबरदारी घेईल असे वाटत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शहर व उपनगर परिसरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. चांभार वाडा परीसरातील डेंगी झालेले रुग्ण वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुण्नालयात उपचार घेत आहेत. चांभारवाडा परिसरातील चर्मकार अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात घरी बसण्याची वेळ आल्यानंतर आता परिस्थिती थोडीसी बदलत असताना गेल्या काही दिवसांपासून चांभारवाडा भागात डेंगीचे रुग्ण वाढू लागल्याने चर्मकार बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या भागातील स्वच्छता चांगल्या प्रकारे केली जात नाही असे मत येथील नागरिकांमधून व्यक्‍त जात आहे. 

कचऱ्याची उचल, गटार स्वच्छता वेळेवर केली जात नाही. त्यामुळे याभागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहेडेंग्यूचे रुग्ण वाढत असतानाही या भागात औषध फवारणीचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे डेंगीचा बळी गेल्यानंतर महापालिका व आरोग्य विभागाचे डोळे उघडणार का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

 हे पण वाचा - चंद्रकांत पाटील यांनी त्या वक्तव्यावर माफी मागावी अन्यथा...  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

 

कोरोनामुळे प्रशासनावर थोडा ताण आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची माहिती वेळेत मिळत नसून आरोग्य खात्याने महापालिकेला माहिती दिल्यानंतर औषध फवारणी व स्वच्छतेची कामे हाती घेतली जातात. ज्या ठिकाणी डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. तेथे पाहणी करुन आवश्‍यक त्या उपाय योजना केल्या जातील. काही दिवसांपूर्वी विष्णू गल्ली व इतर भागात औषधांची फवारणी करण्यात आली होती. 

-डॉ. बसवराज धबाडी, महापालीका आरोग्याधिकारी 

अनेकांना डेंगीची लागण झाली आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या भागातील स्वच्छतेकडे योग्यरित्या लक्ष दिले जात नाही. त्यातून डेंगीचा धोका वाढला आहे. महापालीकेने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्‍यक आहे.

-हिरालाल चव्हाण, रहिवाशी, नाथ पै सर्कल

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dengue patient increase in belgaum