इचलकरंजीत डेंगीचे रुग्ण

Dengue Patients In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Dengue Patients In Ichalkaranji Kolhapur Marathi News

इचलकरंजी : कोरोनाच्या संसर्गाची भीती अद्याप दूर झाली नसताना शहरातील विविध भागात डेंगी आणि चिकनगुन्या सदृश आजारांनी डोके वर काढले आहे. शहरातील विविध भागांत असे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून संबंधित परिसरात तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. 

यापूर्वी विक्रमनगर परिसरात अशा प्रकारचे अनेक रुग्ण आढळून आले होते. या परिसरात युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या. सम्राट अशोकनगरसह विवेकानंद कॉलनी परिसरातही डेंगी सदृश्‍य रुग्ण आढळले आहेत. जवाहरनगर भागातही डेंगीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती आहे. शहरातील अशा विविध भागात या प्रकारचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 

गावभागातील महाराणा प्रताप चौक परिसरातील महिलेसह चौघांना डेंगी झाल्याचे निदान आले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या परिसरात आज सकाळी सर्व्हे केला. पाण्याचे साठे तपासले असून त्यामध्ये औषधे टाकली आहेत. सोबत धूर फवारणी केली आहे. दरम्यान, या परिसरातील गटारींची वेळेत स्वच्छता गेली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

वळीव पावसामुळे... 
पंधरा दिवसांत वळीव पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा परिणाम शहरातील विविध भागात तापाचे रुग्ण वाढण्यावर झाला आहे. खासगी वैद्यकीय प्रयोग शाळेतील तपासणीनंतर अनेकांना डेंगी झाल्याचे निदान होत आहे. 

खासगी रुग्णालयात उपचार 
शहरातील आयजीएम रुग्णालय हे सध्या कोरोना उपचार केंद्र आहे. त्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी अशा प्रकारचे बहुतांशी रुग्ण हे आयजीएम रुग्णालयात उपचार घेत होते. 

तातडीने उपाययोजना
डेंगीसह अन्य आजाराचे संशयीत रुग्ण आढळून आलेल्या परिसरात तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. औषध व धूर फवारणी केली जात आहे. पाण्याचे साठे तपासले जात आहेत. 
- डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com