मिटींग संपली आणि 'साहेब'च आले पॉझिटिव्ह !

राजू पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

दोन महिन्यात तालुका नियंत्रणात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्यावरच आता स्वॅब देण्याची व क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.

राशिवडे बुद्रुक - कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी काल राधानगरीत विशेष बैठक घेतली. त्यानंतर लगेचच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या बैठकीला उपस्थित असलेल्या राधानगरी येथील प्रमुख अधिकाऱ्यांनाच आता आपला स्वॅब देण्याची वेळ आली आहे. 

ज्यांनी गेल्या दोन महिन्यात तालुका नियंत्रणात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्यावरच आता स्वॅब देण्याची व क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. कोरोना बाधितांची संख्या 200 वर गेली तरीही न डगमगता सूत्रबद्धरित्या या तालुक्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी येथील तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व टीम महत्त्वपूर्ण कार्य करत राहिली. विशेष करून लोकांमध्ये प्रसार होणार नाही यासाठी ते दक्षता घेत होते, आवाहन करत होते. स्वतःही काळजी घेत होते. 

वाचा - कोल्हापूरमध्ये ईद साधेपणाने साजरी : भारतातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आणि कोविड योद्ध्याच्या रक्षणासाठी कोली प्रार्थना.... 

अशा परिस्थितीत काल (शुक्रवारी) सायंकाळी येथील परिस्थिती तपासण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी बैठक घेतली. या बैठकीला येथील तहसीलदार, सहाय्यक अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या शेजारीच बसले होते. सर्व तलाठी व कर्मचारी समोर होते. यानंतर रात्री संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.आज सकाळी ही बातमी समजल्यानंतर तालुक्याच्या तहसीलदारांना स्वॅब देणे बंधनकारक राहिलेे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेतीतेसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याल्यांनी स्वॅब दिला आहे.

आम्ही लक्ष ठेऊन

दरम्यान या बैठकीत सुरक्षेचे अनेकांनी नियम पाळले होते. त्यामुळे धोका कमी आहे. तरीही आम्ही लक्ष ठेऊन असल्याचे मत तालुका वैद्यकिय अधिकारी आर. आर. शेटे यांनी व्यक्त केले. 

लोकांनी महत्त्वाच्या कारणास्तव घरातून बाहेर पडू नये. उगाचच जनसंपर्क वाढवू नये. आपल्यासह कुटुंबाचे जीवन महत्त्वाचे आहे. असे अवाहन येथील तहसीलदारांनी केले आहे.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Collector of Kolhapur district tested positive for corona held a special meeting in Radhanagari yesterday