devendra fadnavis at kolhapur and appearance to ambabai temple in kolhapur today morning
devendra fadnavis at kolhapur and appearance to ambabai temple in kolhapur today morning

'कोणत्याही मिशनसाठी नाही तर उर्जेसाठी देवीच्या चरणी आलोय'

Published on

कोल्हापूर : प्रत्येकवेळी कोणत्यातरी मिशनसाठीच देवीच्या चरणी यायचे नसते. तर उर्जेसाठी, आर्शिवादासाठीही देवीच्या दारी येतात. यासाठीच अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज त्यांनी आंबाबाई मंदिरात जावून देवीचे दर्शन घेतले. 

भारतीय जनता पक्षाच्या किसान आत्ममिर्भर यात्रेचा समारोप इस्लामपूर (जि.सांगली) येथे रविवारी (27) झाला. यासाठी फडणवीस इस्लामपूरात आले होते. तेथून रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापुरात आले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. 

सकाळी फडणवीस यांनी आंबाबाईचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आल्यावर त्यांना प्रसारमाध्यमांनी देवीच्या दर्शनाने कोणत्या नव्या मिशनची सुरुवात करणार याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, 'केवळ एखाद्या मिशनच्यावेळीच आईच्या चरणी यायचे नसते. जेव्हा उर्जेची प्रेमाची आवश्‍यकता असते. आर्शिवाद हवा असतो. त्यावेळी देवीच्या चरणी यायचे असते. त्या प्रमाणे मी आज देवीचे दर्शन घेतले. 2020 हे वर्ष तर सर्वांना अडचणीचे गेले. पण 2021 हे वर्ष मात्र सर्वांना सुखा समाधानाचे ऐश्‍वर्याचे जावो अशी मनोकामना देवीच्या चरणी केली आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com