कोल्हापुरात तयारी ; धनगर आरक्षण गोलमेज परिषद शुक्रवारी , शासनाला देणार अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

सकाळी दहा वाजता दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून परिषदेस सुरवात होईल.

कोल्हापूर : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येथील अक्षता मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. २) सकाळी अकरा वाजता गोलमेज परिषदेस सुरवात होईल. आरक्षणासाठी शासनाला अल्टिमेटम देणार असल्याचे संयोजकांनी आज सांगितले. 
निमंत्रक संदीप कारंडे, कल्लाप्पा गावडे, अशोक कोळेकर, बयाजी शेळके, शहाजी सिद, कृष्णात पुजारी, शंकर पुजारी, दीपक शेळके, बाळासाहेब मोटे, नगरसेवक राजसिंह शेळके, राजू बाणदार, अभिजित बन्ने, लक्ष्मण करपे आदी उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून परिषदेस सुरवात होईल. परिषदेसाठी सर्व आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी सर्वजण एकत्रित येतील. परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर, महाराजा 
यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा मध्यभागी असतील. पिवळा झेंडा असेल. परिषदेत भाषण होणार नाही. धनगर जमातीचा एकही खासदार नसल्याने आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत कोणीही उपस्थित करत नाही. परिणामी, घटनेत करावी लागणारी दुरुस्ती, कायद्यातील त्रुटी दूर करण्याबाबत काहीही होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता पुढाकर घ्यावा.

हेही वाचा- दहशतीचा नवा फंडा : चार-आठ जण जमायचे, गल्ली बोळात घुसायचे -

राज्य सरकारची मदत घेऊन सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत धनगर आक्षरण अंमलबजावणीच्या बाजूने भूमिका घेऊन केंद्र-राज्य सरकारने धनगर समाजाबरोबर आहोत. सामाजिक न्यायाच्या बाजूने आहोत हे कृतीतून सिद्ध करावे, अशी भूमिकाही संयोजकांनी मांडली.शिष्यवृत्ती, शैक्षणिक योजना, भूमिहिनांना जमिनी तसेच घरकुलचा लाभ मिळत होता. सर्व योजना केवळ कागदावर आहेत. त्यामुळे परिषदेत महत्त्वाच्या प्रश्नांवरही चर्चा होईल. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ वाफगाव येथील किल्ल्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात रूपांतर करण्याचा प्रश्न, मेंढपाळांचे, विद्यार्थ्यांचे, समाजाच्या अन्य प्रश्‍नांवर चर्चा होईल.

मराठा समाज थोरला भाऊ
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहे. हा समाज आमचा थोरला भाऊ आहे. डोंगरकपारीतील धनगर समाजाची अवस्था बिकट असून आरक्षण मिळालेच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar Reservation Roundtable Council give ultimatum to the government for reservation