कोल्हापुरकर टेन्शन नॉट ; आता तुम्हाला मिळणार अंडी, चिकण, मटण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जिल्हा प्रशासनाने भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू मिळण्याची ठिकाणी आणि वेळा जाहीर केलेले आहेत. भाजीपाला विक्रीला परवानगी देत असतानाच आता अंडी, मटण व चिकन वाहतूक आणि विक्रीस परवानगी दिली आहे .

कोल्हापूर - गेले काही दिवस बंद असलेली चिकन, मटण आणि अंडी विक्रीस आता अधिकृतरित्या परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र याबाबतची पूर्वपरवानगी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून घ्यावी लागणार आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच देण्यात आलेले आहेत. असे असले तरी, ही परवानगी घेण्यासाठी पशूसंवर्धन कार्यालयात जाण्याची गरज नाही. केवळ ९४२३३२३६०९ या नंबरवर व्हाट्सअप मेसेज केल्यानंतर परवानगी दिली जाणार असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वाय ए पठाण यांनी दिली आहे.

संपूर्ण देशावर कोरणा चे सावट आले आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे त. कोरोनचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर 21 दिवसांचा लॉकआऊट करण्यात आलेला आहे. त्यामुळेच भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू साठी लोकांची धावाधाव सुरू आहे. 

गुड न्युज : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लागण कोणाला ही नाही ; सीपीआरमध्ये 450 जणांची तपासणी...  

जिल्हा प्रशासनाने भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू मिळण्याची ठिकाणी आणि वेळा जाहीर केलेले आहेत. भाजीपाला विक्रीला परवानगी देत असतानाच आता अंडी, मटण व चिकन वाहतूक आणि विक्रीस परवानगी दिली आहे.पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या परवानगीने दुकाने खुली केली जाणार आहेत. मात्र यासाठी नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. जसे की मास्क आणि स्यानिटायझर वापर बंधनकारक केले आहे.

ही परवानगी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालय कडे जाण्याची आता गरज नाही. केवळ व्हाट्सअप नंबर वर संबंधिताना ही परवानगी दिली जाणार आहे. तरी संबंधितांनी पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आलेल्या वरील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त वाय ए पठाण यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The district administration has allowed the transportation and sale of eggs meat and chicken