जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांचे मुख्यालय आयजीएममध्ये हलविले

 District Surgeon Dr. B. C. Kempipatil's headquarters shifted to IGM
District Surgeon Dr. B. C. Kempipatil's headquarters shifted to IGM

इचलकरंजी ः शहरात कोरोना संसर्गाने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याची गांभीर्याने दखल प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांचे मुख्यालय आयजीएम रुग्णालयात स्थलांतरीत करण्याचा आदेश आज दिला. याठिकाणी पूर्ण वेळ उपस्थीत राहून मृत्यूदर कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना दिल्या आहेत. 
याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला. 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील आयजीएम रुग्णालय हे पूर्णवेळ "कोविड 19 विलगीकरण रुग्णालय' करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक आवश्‍यक सुविधांची वाणवा आहे. अपुरे कर्मचारी वर्गआहे. यामुळे वेळेत व आवश्‍यक उपचार मिळत नसल्याने कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रविवारीपर्यंत तब्बल 72 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. 
कऱ्हाड येथे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार आवाडे यांनीही याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्यू होण्याचे वाढते प्रमाण ही बाब प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर गांभिर्याने घेण्यात आली आहे. 
जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांना आदेश जारी केला असून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांचे मुख्यालय हे आयजीएम रुग्णालयात स्थलांतर करण्याची सूचना केली आहे. रुग्णालयात पूर्णवेळ उपस्थित राहून रुग्णांच्या उपचारावर नियंत्रण ठेवण्यासह कोविड रुग्णांचे मृत्यू होणार नाहीत, त्याचबरोबर रुग्णांना तातडीने उपचार मिळतील, यावर लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 
आयजीएम रुग्णालयातूनच सर्व नियंत्रण 
आयजीएम रुग्णालयाचे व्यवस्थापन तसेच जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व विविध आदेशाने दिलेली सर्व कामे आयजीएम रुग्णालय येथूनच करावयाची आहेत, असाही आदेश श्री. देसाई यांनी दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com