पुन्हा भाजी मंडई बंद करण्याची वेळ आणू नका ? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

भाजी मंडईमध्ये विनामास्क, हॅन्डग्लोज व सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही.

कोल्हापूर : भाजी मंडईमध्ये विनामास्क, हॅन्डग्लोज व सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे भाजी मंडई पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका, अशा सुचना महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी भाजी मंडईतील व्यवसायिकांना केल्या. महापौर आजरेकर यांनी मंगळवारी उपमहापौर संजय मोहिते, गटनेते शारगंधर देशमुख व महापालिका अधिकारी यांच्या समवेत कपिलतीर्थ भाजी मंडईची पाहणी केली. 

महापौर आजरेकर म्हणाल्या,""मार्केटमध्ये भाजी विक्रेते विना मास्क, हॅन्डग्लोज भाजी विक्री करत असल्याचे आढळत आहेत. भाजी मंडई हे कोरोनाचे हॉटस्पॉट मध्ये असल्याने याठिकाणी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे विक्रेत्यांनी पालन करावे, अन्यथा नाईलाजाने मार्केंट पुन्हा बंद करावी लागतील. मित्र प्रेम मंडळासमोरील रिक्षा स्टॉपच्या परिसरातील प्रवेशद्वारात असलेले नारायणी दुकानाचे अतिक्रमण काढावे. याठिकाणी असलेले पार्किंग व्यवस्था सुरळीत करा. तसेच पार्किंगमध्ये मुख्य रस्त्यावरुन जाण्यासाठी खडीमुरमाचा रस्ता करा. याचबरोबर मार्केंटमध्ये दैनंदिन स्वच्छता व औषध फवारणी करण्याच्या सुचनाही महापौरांनी मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार यांना दिल्या. 

यावेळी गटनेते शारगंधर देशमुख यांनी याठिकाणी विक्रींसाठी बसणारे व्यापारी, दुकानदार व भाजी विक्रेत्यांना नेमुन दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापली असल्याचे निदर्शनास आणले. प्रत्येकाला पट्टे मारुन दिले तर आणखीन रस्त्यावरील विक्रेते बसवता येतील.

मार्केटमध्ये धान्य व्यापारी व्यवसाय करत असलेल्या ठिकाणची उंची नियमाप्रमाणे करावी, असे सांगितले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार, पंडीत पोवार, ऋषीकेश सरनाईक, राजेद्र पाटील आदी उपस्थित होते. 

महापौर म्हणाल्या... 
- मंडईत मास्क, हॅन्डग्लोज, सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही 
- भाजी मंडई हे कोरोनाचे हॉटस्पॉट 
- विक्रेत्यांनी नियम, सूचनांचे पालन करावे 
- मार्केंटमध्ये दैनंदिन स्वच्छता,औषध फवारणी करा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't bring time to close vegetable market?