बापरे ; कोल्हापुरात क्वारंटाईन कक्षातच झाली ‘ओली पार्टी’

drink party in quarantine center at kolhapur
drink party in quarantine center at kolhapur
Updated on

कोल्हापूर : जेवणासाठी आणलेल्या पाण्याच्या बाटलीच्या बॉक्‍समधून दारूच्या बाटल्या आणून शहरातीलच एका क्वारंटाईन कक्षात रात्री जोरदार ओली पार्टी झाली. या बाटल्या त्याच परिसरात टाकल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. सर्वांना केवळ समज दिली.

देशात विविध ठिकाणी क्वारंटाईन कक्षात कोण क्रिकेट खेळताना व्हिडिओ व्हायरल होतो. कोण सामूहिक नृत्य करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असताना कोल्हापूरमध्ये मात्र चक्क दारू पिऊन ओली पार्टी साजरी केली आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कमी व्हावेत, कोल्हापूर कोरोनामुक्त व्हावे म्हणून सर्वसामान्य लोक नियम आणि अटींचे पालन करीत आहेत. उलट क्वारंटाईन कक्षात ओली पार्टी करून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी समज देऊन सोडून दिले जात आहे. 

या क्वारंटाईन कक्षाबाहेर देशी-विदेशी बाटल्यांचा खच पडला आहे. यामध्ये अनेक बाटल्या फुटल्याने काचा पसरल्या आहेत. काही लोकांच्या पार्टीमुळे इतर लोकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. क्वारंटाईन लोकांचा धिंगाणा पाहून तेथील नागरिकांनी याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना त्याची उत्तरे मिळाली नाहीत. शनिवारी रात्री झालेल्या या पार्टीची तिथेच असलेल्या काही लोकांनी तत्काळ तक्रार केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि संबंधितांना समज दिली. मात्र, याची सखोल चौकशी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्याचे खात्रीशीर माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com