बदलत्या जगाचा उद्योगांवर परिणाम : श्रीराम पवार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

भविष्यातील आव्हाने आणि संधी ओळखून भारतीय उद्योजकांनी आतापासूनच सज्ज झाले पाहिजे

 

कोल्हापूर : एकूणच जगाचा विचार केला तर जागतिक रचनाच बदलू लागली आहे आणि त्याचा भारतीय उद्योगांवर निश्‍चितच परिणाम होणार आहे. भविष्यातील आव्हाने आणि संधी ओळखून भारतीय उद्योजकांनी आतापासूनच सज्ज झाले पाहिजे, असे स्पष्ट मत ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमन- ‘आयआयएफ’च्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे झालेल्या सभेत ते बोलत होते. ‘बदलते जागतिक प्रवाह आणि त्याचा भारतीय उद्योगावरील परिणाम’ या विषयावर त्यांनी 
संवाद साधला.

हेही वाचा- बाप्पाच्या आगमनादिवशीची गर्दी टाळणार ;  बैठकीत मूर्तीकारांचे आश्‍वासन -

कोरोनाची महामारी, त्या पार्श्‍वभूमीवर जगातील एकूणच बदलती स्थित्यंतरं, उद्योग व तंत्रज्ञानातील बदलते प्रवाह, त्यातील आव्हाने व संधी, शासनाची विविध धोरणे, त्याची अंमलबजावणी अशा विविध अंगांनी संपादक संचालक श्री. पवार यांनी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, ‘‘ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा परिणामही जगावर जाणवू लागला. त्यातून अनेक पर्यावरणीय बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्याचाही एकूणच भारतीय उद्योग आणि उद्योगांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होणार असून, त्यादृष्टीनेही उद्योजकांनी विचार करायला हवा.’’ 

हेही वाचा- आयटी क्षेत्रातील तरूण रमले वन शेतीत; पडीक, दगडधोंडे व उताराच्या जमीनीत लावली 800 झाडे....वाचा सविस्तर बातमी -

जगाची विभागणीच आता तीन ते चार गटांत होऊ लागली आहे. त्यात भारत कोणत्या गटाच्या बाजूने असेल, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. तंत्रज्ञानातही आता मोठ्या प्रमाणात बदल होऊ घातले आहेत. त्याचाही विचार उद्योजकांनी करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या वेळी अध्यक्ष संजय चौगुले, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव समीर पाटील, खजानीस विनय खोबरे आदी उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editor in Chief Shriram Pawar speaking at a meeting hosted by the Kolhapur Chapter of the Institute of Indian Foundryman IIF