esakal | .....म्हणून कोल्हापूरात दहा तालुक्यांत शैक्षणिक प्रतीची केली होळी
sakal

बोलून बातमी शोधा

educational organizations Demand for New education policy of the central government opposed to progressive thinking

करवीर तहसीलदार कार्यालयासमोर दुपारी दोन वाजता शैक्षणिक धोरणाची प्रत जाळण्यात आली.

.....म्हणून कोल्हापूरात दहा तालुक्यांत शैक्षणिक प्रतीची केली होळी

sakal_logo
By
ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर  : शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात केंद्राचे नवे शैक्षणिक धोरण आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करू नये. अशी मागणी डाव्या शैक्षणिक संघटनांनी केली.  शैक्षणिक धोरणाचा निषेध म्हणून आज त्यांनी जिल्ह्यात दहा तालुक्यांमध्ये शैक्षणिक धोरणांच्या प्रतीची होळी केली.


  करवीर तहसीलदार कार्यालयासमोर दुपारी दोन वाजता शैक्षणिक धोरणाची प्रत जाळण्यात आली.  नव्या शैक्षणिक धोरणामुळे समाजातील वंचित घटकाला उच्च शिक्षण घेणे परवडणार नाही. समाजातील मोठा घटक शिक्षणापासून वंचित राहील. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शैक्षणिक संस्था भांडवलदारांच्या हातात जातील. यातून समाजामध्ये नवी विषमता तयार होईल. अशी भूमिका डाव्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा- नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या आणि एन.ए परीक्षार्थींसाठी कोल्हापूरातून विशेष गाडीची सोय़ : असे आहे वेळापत्रक

केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण शाहू, फुले आणि आंबेडकर यांनी मांडलेल्या पुरोगामी विचारांच्या विरोधात असून, राज्य सरकारने या धोरणाची अंमलबजावणी न करण्याचा ठराव मंजूर करावा. असे मत सर्वांनी यावेळी व्यक्त केले.या आंदोलनामध्ये माजी आमदार संपतबापू पाटील, गिरीश फोंडे, अतुल दिघे, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, रमेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे