भुदरगड तालुक्यातील आठ वर्षीय बलिकेस कोरोनाची बाधा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

वासणोली येथील एक कुटुंब मुंबई येथून दिनांक १२ मे रोजी खाजगी वाहनाने गावी आले.

कडगाव (कोल्हापूर) - भुदरगड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत असून वासनोली येथील मुंबई वरून आलेल्या कुटुंबातील आठ वर्षीय बलिकेस कोरोनाची बाधा झाली आहे.

वासणोली येथील एक कुटुंब मुंबई येथून दिनांक १२ मे रोजी खाजगी वाहनाने गावी आले.१३ मे रोजी त्यांचे स्वॅब कोल्हापूर येथे घेऊन त्यांना शिवाजी विद्यापीठ येथे अलगिकरणात ठेवण्यात आले होते.१८ मे रोजी हे कुटुंब गावी आले.त्यांना गावातील प्राथमिक शाळेत अलगिकरण करून ठेवण्यात आले.या पैकी आठ वर्षीय मुलीचा मंगळवारी १९ मे रोजी रात्री उशिरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.सदर मुलीस पुढील उपचारासाठी गारगोटी येथील कोरोना उपचार केंद्रात पाठवण्यात आले.

वाचा - विपरीतच घडलं ! तिने सायरनचा आवाज ऐकला अन् तिच्या जिवाच झालं वाईटच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight year old girl Corona positive from Bhudargad taluka