दुभाजकावर बराच काळ ती बसून राहिली अन् क्षणात एस.टी चाकाखाली मारली उडी

Elderly man commits suicide by leaning under ST crime case in marathi
Elderly man commits suicide by leaning under ST crime case in marathi

कोल्हापूर  : एस.टी.बसच्या मागील चाकाखाली झोकून देऊन वृद्धेने आत्महत्या केल्याची घटना आज व्हीनस कॉर्नरजवळ घडली. या महिलेचे वय 55 ते 60 असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला. वृद्धेने हिरव्यारंगाची साडी नेसली असून गळ्यात मणी मंगळसूत्र व पायातील बोटात जोडवी आहेत. अचानक घडलेल्या घटनेने परिसात गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी पोलिसांनी बोलावून तिला सीपीआरमध्ये नेले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले. शाहुपूरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वृद्धा सकाळी 10 ते 10.30 या कालावधीत व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नर या रस्त्यावरील दुभाजकावर बराच काळ बसून होती. तेथून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी त्यांची विचारपूसही केली मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने तेथून एस.टी. बस निघाली होती. क्षणात वृद्धेने बसच्या मागच्या चाकाखाली उडी मारली. त्यांच्या शरीरावरून बसचे चाक केले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. 

काही जणांनी पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी तिला सीपीआरमध्ये नेले. तेथे शवविच्छेदन केले. ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. नागरिकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. 

बसस्थानकामध्ये पहिला प्रयत्न 
सकाळी ही वृद्धा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरताना दिसत होती. त्यानंतर ती एका एस.टी.च्या चाकाखाली झोपली होती. कंट्रोल रूमच्या सीसीटीव्हीमध्ये हे दिसले. तात्काळ कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले आणि तेथून बाजूला पाठवले. 


संपादन-अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com