काम तू करणार की, मी यावरून वाद; पाच वर्षे दुर्लक्ष अन् आता विकासकामांसाठी चुरस

election and interested candidates to voters from working conditions in kolhapur
election and interested candidates to voters from working conditions in kolhapur
Updated on

कोल्हापूर : महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भागाभागांत किरकोळ स्वरूपाच्या कामावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. कामापेक्षा हे काम तू करणार की, मी यावरून वादंग निर्माण होऊ लागला आहे. निवडणूक जवळ आली की, सर्वांनाच भागातील नागरिकांचा कळवळा सुरू होतो. एरव्ही पाच वर्षे ढुंकूनही पाहणार नाही. आता मात्र विकासकामांसाठी चुरस सुरू झाली आहे. 

ड्रेनेजच्या चेंबरचे कामही श्रेयवादातून सुटलेले नाही. संबंधित काम झाले आणि त्या भागातील लोकांनी ज्याने काम केले त्याला मते दिली, तर आपले कसे होणार या विवंचनेतून वाद सुरू झाला आहे. एरव्ही खेळाच्या मैदानाचा विकास कोणाला दिसला नाही. आता मात्र अमूक एका मैदानासाठी काही कोटींचा निधी आणल्याचे डिजिटल बोर्ड झळकू लागले आहेत. आपला प्रतिस्पर्धी बोर्ड लावतो म्हटल्यावर आपणही मागे पडायचे नाही, या भावनेतूनही ईर्ष्या सुरू झाली आहे. 

एखादा इच्छुक उमेदवार भागात दिसायचा अवकाश... तो काय करतो, कोणाशी बोलतो यावर वॉच ठेवला जातो. चुकून विरोधकाच्या हातून छोटे जरी काम होणार म्हटले तरी आडवे कसे पडायचे, याची व्यूहरचना केली जाते. एकाही गल्लीचे मतदान विभागता कामा नये, ही यामागील भावना. त्या त्या भागातील लोकांचे काम होणे महत्त्वाचे आहे की, इच्छुक उमेदवारांचा श्रेयवाद महत्त्वाचा आहे याचे कोडे कोणाला उलगडत नसल्याचे चित्र आहे. कोणत्याही उमेदवारासोबत आता बोलायचा अवकाश राहिलेला नाही. असा कोणी नजरेस पडला तर त्याच्या भोवती संशय व्यक्त केला जातो. एक वेळा, दोन वेळा सांगून पाहिले जाते. नंतर मात्र कोल्हापूर पद्धतीने ‘डोस’ दिला जातो. उमेदवारांच्या ईर्ष्येत नागरिकांची पंचाईत होऊ लागली आहे. एकाला काम सांगावे, तर दुसऱ्याला राग येतो आणि दुसऱ्याला काम सांगावे, तर पहिला राग धरतो, अशी अडचण झाली आहे. काम होते ना म्हणून कोणी मनाचा मोठेपणा दाखविण्यास तयार नाही. 

...अन्‌ प्रश्‍नांची जाणीव झाली

एरव्ही गेली पाच वर्षे ड्रेनेज का तुंबते, पुरेशा दाबाने पाणी येते की नाही, रस्ता नीट आहे की नाही याची विचारणा कोणी केली नाही. नेमकी निवडणूक लागली आणि प्रश्‍नांची जाणीव होऊ लागली आहे. मतदारराजा पण हुशार आहे. काम करण्यामागील नेमका हेतू काय याची जाणीव त्यांनाही असते, हे लक्षात घ्यायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com