प्रभागांमध्ये निवडणुकीचे वारे ; कोण किती देणार, चर्चांना आलंय उधाण

election fever of corporation in kolhapur gift from voters house
election fever of corporation in kolhapur gift from voters house
Updated on: 

कोल्हापूर : निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. कार्यक्रमही जाहीर झालेला नाही. गल्लीनिहाय तसेच कॉलनीत काहींच्या प्रचारफेऱ्या सुरू आहेत. महापालिका लगतचा प्रभाग निवडणुकीपूर्वीच चर्चेत आला आहे. जेवणावळीच्या पंगती निवडणुकीपूर्वीच उठल्या आहेत. कोण किती देणार याची चर्चा सुरू झाली आहे.

अठरा पगड जातीचे लोक प्रभागात वास्तव्यास आहेत. सध्या गठ्ठा मतदान कोणत्या समाजाचे, यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातूनच हाती स्टीलचा कुंडा पडल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. निवडणूक जशी जवळ येईल तसे घरापर्यंत आणखी कोणत्या भेटवस्तू येतील याची चर्चा रंगली आहे. प्रत्येक प्रभागात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विरोधी उमेदवाराने अमूक एकाची भेट घेतली, की दुसरा इच्छुक उमेदवार अवघ्या पाच ते दहा मिनिटात भेटीसाठी येतो. कोण कोणाकडे आहे, याची माहिती काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

आपल्याकडून एकही कार्यकर्ता दुखावला जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी एकत्रित भोजनाचा बेत आखला जात आहे. जोडण्या लावण्यासाठी विशिष्ट कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपविली जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. कार्यकर्त्यांनी मागायचे आणि उमेदवाराने ते द्यायचे अशीच स्थिती सर्व प्रभागात राहणार आहे. संसारोपयोगी वस्तू देण्यावर सध्या भर आहे. निवडणूक होईपर्यंत आणखी काय काय पदरात पडते याकडे लक्ष लागून राहिले आहे. मतदारराजा उदार होण्याऐवजी उमेदवारच अधिक उदार होऊ लागले आहेत.

संक्रांत झाली तरी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने संक्रांतीचे वाण मात्र देणे अद्याप सुरूच आहे. महापालिका लगतच्या प्रभागात स्टीलचा कुंडाच लोकांच्या हाती ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. संक्रांतीला तिळगूळ वाटप झाले. काहींनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. निमित्त सणाचे असले तरी त्यामागे मतदारांशी संपर्क हेच प्रमुख कारण होते. 
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com