FasTag Update : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा; वाहन चालकांचा राडा

pune bengaluru national highway fastag implementation vehicle marathi news
pune bengaluru national highway fastag implementation vehicle marathi news

घुणकी (कोल्हापूर)  : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर फास्टँग सुरु झाल्यामुळे  किणी( ता. हातकंणगले) येथील पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या आहेत. फास्टँग नसलेली वाहनांच्यामुळे गर्दी होत असल्याचे पथकर व्यस्थापनाने सांगितले.पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा ते कागल दरम्यानचे चौपदरीकरण झाले आणि २००५ पासून पथकर वसुलीसाठी  कोल्हापूर जिल्ह्यातील किणी (ता.हातकणंगले) आणि सातारा जिल्ह्यातील तासवडे येथे पथकर नाके सुरू झाले. 

किणी येथे पथकर वसुलीसाठी ८ लेन आहेत. सुट्टी आणि रविवारी इथे गर्दी होत असल्याने बाजूला ३ लेन सुरू केल्या जातात.
 गेले वर्षभर वाक्षन चालकांनी फास्टँग घ्यावा असे आवाहन केले जात होते. गेल्या महिन्यापूर्वी फास्टँग सुरु केला आणि वाहनांच्या रांगा लागल्या.  त्याच दिवशी १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली.
 मुदतवाढीनंतर ठरल्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्री पासून फास्टँग ची अमलबजावणी झाली.   ज्या वाहनांवर फास्टँग नाही. त्या वाहनांकडून डबल रक्कम घेतली जात असल्याने वाहन चालक वाद करीत आहेत. यामुळे फास्टँग घेतलेल्या वाहन चालकांना वेळ होत असल्याचे पहायला मिळाले.या प्रकारामुळे दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. वाहनात बसलेल्या प्रवाशांना उन्हाच्या तिव्र झळा बसल्या.

दुप्पट वसुलीमुळे वाद

ज्या वाहनांवर फास्टँग नाही. त्या वाहनांकडून दुप्पट पथकर घेताना वाद होताना दिसला.


आदेशाची अमलबजावणी
 शासनाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करीत असून
 फास्टँगमुळे वाहन १५ सेंकदात जाते. पैसे देण्यासाठी किमान चार ते पाच मिनिटे  लागतात. चालकांनी स्वत:सह अन्य वाहनांचा वेळ वाचवण्यासाठी फास्टँग घ्यावा.

भोईटे,किणी पथकर व्यवस्थापक

नागरीकांना होतोय  त्रास 

घुणकी मार्गे वाहने आज फास्टँगमुळे शेकडो वाहने घुणकी, चावरे,किणी मार्गे वाहनांचा प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे गावातील नागरीकांना प्रचंड त्रास झाला.

फास्टँग नसलेल्यांची सोय

फास्टँग नसलेल्यांची सोय होण्यासाठी दोन लेनवरुन रक्कम घेण्याची सोय करण्यात आली. काही वाहन चालक दुप्पट रक्कम देऊन जात होते. तर काही वाद करीत होते.
 

फास्टँग घेण्याचे आवाहनज्या वाहनांकडे फास्टँगची सोय नाही. त्यांच्या सोयीसाठी फास्टँग देण्याची सोय केली आहे. तसेच जनजागृती केली जात असल्याचे पहायला मिळाले.

फास्टँगला मुदतवाढ मिळावी

फास्टँगला आणखी काही महिने मुदतवाढ मिळावी अशी मागणी वाहनचालकांनी केली.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com