बेळगावात 60 मेगावॉटने वीजेच्या मागणीत घट ; लॉकडाऊनचा परिणाम

Electricity demand decreases by 60 MW in Belgaum
Electricity demand decreases by 60 MW in Belgaum

बेळगाव - दरवर्षी उन्हाळ्यात वीजेच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागाला कमी-अधिक प्रमाणात भारनियमनालाही तोंड द्यावे लागते. परंतु, यंदा मात्र चित्र वेगळे आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून वीजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. बेळगावात वीजेची मागणी 125 मेगावॉटवरुन 65 मेगावॉटपर्यंत खाली आली आहे. औद्योगिक क्षेत्रासह इतर व्यवसाय ठप्प झाल्याने मागणीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही सुरळीत वीजपुरवठा होत आहे. 

दरवर्षी उन्हाळा जवळ येताच वीजेच्या मागणीत मोठी वाढ होते. त्यामुळे शहरासह औद्योगिक वसाहतींना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात भारनियमन करावे लागते. मात्र, यावेळी लॉकडाऊनमुळे वीजेची मागणी कमी झाली आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर शहरातील कंपन्या, आस्थापने पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे एरव्ही 125 ते 130 मेगावॉट वीज मिळत असताना मागणी व पुरवठ्याचे गणित साधताना हेस्कॉमची होणारी कसरत कमी झाली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व सुरळीत झाल्यानंतर पुन्हा वीजेच्या मागणीत वाढ होणार आहे. 

गतवर्षी राज्यात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने सर्व जलाशये तुंडुंब भरली होती. त्यामुळे राज्यात वीजेचे उत्पादन समाधानकारक होत आहे. तसेच थर्मल, सौर व पवनऊर्जेच्या माध्यमातूनही अधिक प्रमाणात वीज मिळत आहे. परंतु, मागणीत घट झाल्याने अनेक संयत्र बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच यंदा भारनियमनाची वेळच येणार नाही, असे मत अधिकाऱ्यांतून व्यक्‍त होत आहे. 

9 मिनिटांत 76 मेगावॉटची घट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या जागतिक महामारीविरोधात लढण्यासाठी नागरिकांनी संघटीत होत रविवारी (ता. 5) रात्री 9 वाजता घरातील दिवे बंद करुन मेणबत्ती, दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत नागरिकांनी 9 वाजता काही मिनिटांसाठी दिवे बंद केले होते. याकाळात हेस्कॉमच्या अखत्यारीतील जिल्ह्यांमध्ये वीजेच्या मागणीत 76 मेगावॉटची घट झाली होती, अशी माहिती हेस्कॉमने दिली. 

दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात वीजेची मागणी वाढते, मात्र यंदा लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात मागणीत घट झाली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर मागणीत पुन्हा वाढ होईल. सध्या सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. 
-एन. एन. पटेल, सहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com