दुर्दैव! बापाच्या निधनानंतर दोन वर्षातच मुलाचा अपघाती मृत्यू

employee of primary health centre accident and he dead in gadhinglaj kolhapur
employee of primary health centre accident and he dead in gadhinglaj kolhapur
Updated on: 

उत्तूर (कोल्हापूर) : उतूर-गडहिंग्लज रस्त्यावर काल झालेल्या अपघातात उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी ओंकार विजयकुमार पाटील (वय २५, मूळ गाव भादवणवाडी, ता. आजरा, सध्या रा. सिद्राम कॉलनी, गडहिंग्लज) ठार झाला.  

मोटार व मोटारसायकलची धडक झाली. त्यात मोटारीतील आभिषा कलमिसकर (१२, रा. सावंतवाडी) जखमी झाली. उत्तूर विद्यालयाजवळ सायंकाळी सातच्या दरम्यान अपघात झाला. आजरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : ओंकार, आरोग्य केंद्रातून मोटारसायकल (एम. एच. ११ सी. ए. ०२११) वरून गडहिंग्लजकडे जात होता. सावंतवाडीकडे जाणाऱ्या मोटारीशी (एम. एच. ०२ बी. डी. २६६६) धडक झाली. त्याच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. त्याला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

ओंकारचे वडील शिक्षक होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. ओंकारला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. सुरवातीला पशुवैद्यकीय विभागात काम केल्यावर आरोग्य विभागाकडे त्याची बदली झाली. उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या काळात त्याने चांगले काम केले होते. त्याच्या मागे आई, दोन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com