sakal

बोलून बातमी शोधा

Entry of fifty thousand vehicles in one day in Kolhapur

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दररोज कोल्हापूर जिल्ह्यात इतर ठिकाणाहून येणारे सरासरी 3 हजार लोकसंख्या होती.

कोल्हापूरमध्ये एका दिवसात तब्बल पन्नास हजार वाहनांची एन्ट्री

sakal_logo
By
सुनील पाटील ; सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून ई-पास रद्द करण्यात आला. त्यामुळे इतर जिल्ह्यातून कोल्हापूरात येणारे सर्व नाके हटविण्यात आले आहेत. किणी, कोगनोळी, गगनबावडा, सांगलीसह इतर ठिकाणाहून एका दिवसात सुमारे लहान मोठी सुमारे 50 हजार वाहने आज कोल्हापूर जिल्ह्यात आली आहेत. तर, दहा ते पंधरा हजार वाहने या सर्व नाक्‍यावरून बाहेर गेली आहेत. 

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दररोज कोल्हापूर जिल्ह्यात इतर ठिकाणाहून येणारे सरासरी 3 हजार लोकसंख्या होती. लॉकडाऊन कडक केल्यानंतर किंवा ई-पास तात्पुरता बंद केल्यानंतर अत्यावश्‍यक सेवा किंवा अतिदक्षतेसाठी म्हणून दररोज 2 हजार लोक कोल्हापूरमध्ये आले होती. आजपासून ई-पास रद्द करण्यात आला आहे. याचे काल आदेश काढण्यात आले. ऑनलाईन न्यूजच्या माध्यमातून बघता-बघता हा आदेश प्रत्येकापर्यंत पोचला. त्यानुसार आजपासून कोल्हापूरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सरासरी पन्नास हजार लहान मोठी वाहने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दाखल झाली आहेत. आता या सर्वांची तपासणी, त्यांचे क्वारंटाईन, आरोग्याची काळजीही घेण्याची जबाबदारी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवर आहे. लोकांनी स्वत:हून आता आपली काळजी घ्यावी लागणार आहे. असे झाले नाही तर मात्र, कोरोना संसर्ग पुन्हा नव्याने जोरात आणि गतीमान होण्यास वेळ लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. 

पुणे ते कोल्हापूर, रत्नागिरी, पणजी, गोवा ते कोल्हापूर, बेगळगाव ते कोल्हापूर, सांगली ते कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक आणि रहदारी नव्याने वाढली आहे. हजारो वाहनांचा चाकांना पुन्हा गती घेतली आहे. या गतीसोबत आता काळजीही घ्यावी लागणार आहे. 

हे पण वाचाकोल्हापूरतील सर्व नाके हटवले पण गाव-प्रभाग समितीवर असणार ही महत्वाची जबाबदारी

दरम्यान, परवापर्यंत कोल्हापूर शहरातील वाहतूक आता अनेक पटीने वाढली आहे. रस्त्यावर उभे रहायलाही जागा नाही, असेच चित्र सर्वच शहरात दिसून येत आहे. तावडे हॉटेल ते सीबीएस स्टॅंडपर्यंतचा रस्ता पुन्हा गर्दीने गजबजला आहे. सुरक्षिततेचा कोणतेही नियम न पाळता वाहतूक सुरु आहे. अशी वाहतूक निश्‍चितपणे धोकादायक ठरू शकते. ट्रॅक, चारचाकी, रिक्षा, बस, खासगी बस, दुचाकी, टेंम्पोसह इतर वाहनांची वर्दळ वाढली आहे. 

हे पण वाचाकठीण परिस्थितीत या व्यवसायातून कमावले लाखो रूपये ; तब्बल साडेतीनशे कुटुंबे करतात हाच व्यवसाय


संपादन - धनाजी सुर्वे 

go to top