धक्‍कादायक.... पती पाठोपाठ पत्नीने ही संपवले जीवन...

Exciting incident of husband and wife committing suicide due to family quarrel
Exciting incident of husband and wife committing suicide due to family quarrel
Updated on

बेळगाव - कौटूबिंक कलहातून पती पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवार (ता.8) सकाळी आमटूर (ता. बैलहोंगल) येथे घडली आहे. गुरुनाथ नारायण तावरे (वय 44) आणि मिनाक्षी (वय 34, दोघेही मुळ रा. चिक्‍कमुन्नोळी ता.खानापूर सध्या रा. आमटूर ता. बैलहोंगल) अशी त्यांची नावे आहेत. गुरुनाथ यानी विष प्राशन करुन तर मिनाक्षी यांनी गळफास घेउन जीवन संपविले आहे. गुरुनाथ हे पेशाने शिक्षक होते. या घटनेमुळे खानापूर आणि बैलहोंगल तालुक्‍यात खळबळ उडाली असून घटनेची नोंद बैलहोंगल पोलिसात झाली आहे.

याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, तावरे दांपत्य मुळचे खानापूर तालुक्‍यात चिक्‍कमुन्नोळ्ळी येथील राहणार असून गुरुनाथ हे बैलहोंगल तालुक्‍यातील आमटूर प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यामुळे ते गेल्या काही वर्षापासून आमटूर येथे सपत्नीक भाड्याच्या घरात होते. मात्र, त्यांच्यामध्ये कौटुंबिक वादाचा खटला खानापूर न्यायालयात सुरु होता. बेळगाव बैलहोंगल रोडवरील रोडवरील शेतात गुरुनाथ यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. ही माहिती समजताच पत्नी मिनाक्षी यांनी दहाच्या सुमारास घरात गळफास घेउन आत्महत्या केली. एकापाठोपाठ पती पत्नीने जीवन संपविल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. मिनाक्षी यांचे माहेर बेळगाव असल्याने या घटनांचा बेळगावला देखील धक्‍का बसला आहे.

kolhapur corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com