
पोलिसांनी दिलेली माहिती, शाहूपुरी पोलिसांनी मार्केट यार्ड येथे सापळा रचून संशयित अनिल तावडेला ताब्यात घेतले
कोल्हापूर - मार्केट यार्ड परिसरातून जप्त केलेल्या पिस्तूल प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शाहूपुरी पोलिसांनी कणकवली येथे पाठलाग करून जेरबंद केले. समीर सलीम मेस्त्री (वय 20, कलमठ, कणकवली) असे त्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, शाहूपुरी पोलिसांनी मार्केट यार्ड येथे सापळा रचून संशयित अनिल तावडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल व जीवंत राऊंडही जप्त केला. तपासात त्याने हे पिस्तूल कणकवलीतून आणल्याचे सांगितले. या प्रकरणाचा खोलवर तपास करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास पोवार, प्रशांत घोलप व दिग्विजय चौगले यांचे पथक गुरुवारी कणकवलीला गेले होते. पथकाला संशयिताचा सुगावा लागला. त्याला पकडण्यासाठी बाजारपेठेत सापळा लावला.
हे पण वाचा - भन्नाटच : मतदान केले तरच मिळणार चिकन-मटन
पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत संशयिताने त्याचे नाव समीर मेस्त्री असल्याचे सांगून हे पिस्तूल आपणच दिल्याची कबुली दिली. त्याला कणकवली पोलिस ठाण्यात नेऊन तेथून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणून अटकेची कारवाई केली. पथकातील पोवार, घोलप व चौगले हे या कारवाईतील हिरो ठरले.
संपादन - धनाजी सुर्वे