भन्नाटच : मतदान केले तरच मिळणार चिकन-मटन

gram panchayat election 2021 kolhapur sidhnerli
gram panchayat election 2021 kolhapur sidhnerli

सिद्धनेर्ली - येथील एका मटन विक्रेत्याने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदान केलेल्या ग्राहकांनाच मटन व चिकन देण्याची शक्कल लढवली आहे. त्यामुळे हा मटन विक्रेता ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच चर्चेत आला आहे.

येथील सचिन पाटील यांचे सिद्धनेर्ली  पैकी नदीकिनारा येथे मटन व चिकन विक्रीचे दुकान आहे. आज सिद्धनेर्लीसह परिसरामध्ये एकोंडी,  शेंडूर,व्हन्नूर आदी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आजच किंक्रात सणसुद्धा साजरा होत आहे. यासाठी खवय्यांची चिकन व मटण खरेदीसाठी दुकानांसमोर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. मात्र या चिकन विक्रेत्याने ग्रामपंचायतीसाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. याला प्रोत्साहन  मिळावे. म्हणून फक्त मतदानाचा हक्क बजावला असलेल्या ग्राहकांनाच चिकन व मटण विक्री केली. त्यांनी सकाळपासून मतदान न केलेल्या ग्राहकांना परत पाठवले व मतदान करून या व हाताच्या बोटावर शाई दाखवा .आपल्याला चिकन किंवा मटण दिले जाईल.

अशा पद्धतीने विनंती केली. याबाबत सकाळ'शी बोलताना ते म्हणाले इतर वेळी नेहमीच व्यवसाय म्हणून विक्री करीत असतो.मात्र आज सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, लोकशाही बळकट करावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. काही प्रमाणात ग्राहक परत जातील किंवा विक्री कमी होईल पण त्यापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देऊन हा निर्णय घेतला आहे. त्याला ग्राहकांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com