सुप्रसिद्ध पैलवान सादिक पंजाबी यांचे दुःखद निधन...

संदीप खांडेकर
Wednesday, 22 July 2020

कोल्हापूरमधील शाहू विजयी गंगावेस तालमीत त्यांची जडणघडण....

कोल्हापूर - नामवंत पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी यांचे निधन झाले. लाहोर शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

कोल्हापूरमधील शाहू विजयी गंगावेस तालमीत १९६० ते १९६३, तर त्यानंतर मठ तालमीत त्यांची जडणघडण झाली. भारतातून पाकिस्तानला परतल्यावर लाहोरमधल्या आखाड्यात ते पैलवानांना माती व मॅटवरील कुस्तीचे धडे देत होते. हिंदकेसरी मारुती माने यांचे ते मित्र होते. हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्याशी त्यांचा तालमीत असताना नेहमी संपर्क असायचा. आयुष्यात एकदा पुन्हा कोल्हापुरात येऊन रंकाळ्यावर फिरायचे आहे, अशी इच्छा होती. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. त्यांचा मुलगा सज्जन पंजाबी हा पैलवान असून, तोही पैलवानांना मार्गदर्शन करतो.एक देखना अन् मोठ्या जोडीतला मल्ल म्हणुन त्यांची ख्याती होती.भारतात तसेच कोल्हापुरात त्यांना खुप प्रेम मिळाले.त्यांच्या अनेक लढती गाजल्या. अचानक त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous wrestler Sadiq Punjabi passed away