
बेळगाव - शेतकरी आयुष्यभर राबत असतो... त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळेलच असे नाही... तरीही तो आपण किती कष्ट केलो याची कधीही मोजमाप करीत नाही. मात्र, वडगाव येथील एका शेतकऱ्याने शेतकरी किंवा त्याचे बैल शेतीकामात किती कष्ट घेतात, याची चक्क नोंदच केली. एका दिवसात शेतामध्ये भाताची पेरणी करताना शेतकरी व त्यांच्या बैलांना तब्बल 27 किलोमीटर चालावे लागले. शेतकऱ्यांच्या या कष्टाच्या चाचणीमुळे त्यांच्या श्रमाची कहाणी थक्क करणारी ठरली आहे.
मोबाइलमधील ऍपचा वापर करून शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागतो याची सहजपणे चाचणी घेतली. वडगाव येथील शेतकरी किर्तीकुमार कुलकर्णी यांनी भाताची पेरणी करण्यासाठी किंवा शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो याची मोजमाप करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील ऍपद्वारे मोजदाद करून शेतकऱ्याचे कष्ट दाखवून दिले आहे. श्री. कुलकणीं यांची वडगाव परिसरात शेती असून ते विविध प्रकारची पिके घेत असतात. दरवेळी शेतकऱ्यांच्या पिकांना दर मिळत नाही तसेच सरकारकडूनही शेतकऱ्यांची योग्य प्रकारे दखल घेतली जात नाही. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना भाजीपाला टाकून द्यावा लागला तसेच दर कमी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी शेतात किती कष्ट घेतो हे दाखवून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतात करीत असलेल्या कामाची मोजमाप केली आहे.
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रत्येक गोष्ट त्यांनी ऍपद्वारे मोजली आहे. स्वतःच्या साडेचार एकर शेतात पेरणी करतेवेळी त्यांनी ऍपचा वापर केला. यावेळी साडेचार एकर पेरणी करण्यासाठी शेतकरी व बैलांना 27 किलो मीटर चालावे लागल्याचे नोंद झाले. तसेच साडे चार एकर पेरणीसाठी 10 तासांचा वेळ लागला असून सकाळी 8 ते 2 व दुपारी 3 ते सायंकाळी 7 यावेळेत पेरणी करण्यात आली. कुलकर्णी यांच्यासह किसन होसूरकर व सुरेश खन्नूकर यांनी पेरणीच्या कामात भाग घेतला. इतर कामांसाठीही शेतकरी शिवारात मोठ्या प्रमाणात चालत असतो. ही एक प्रायोगिक गोष्ट असून शेतकऱ्यांचे कष्ट मोजल्यास असे अनेक धक्कादायक चित्र समोर येतील.
शेतकरी मोठ्या प्रमाणात कष्ट घेत असतो मात्र, त्याला कधीच त्याच्या कामाचा मोबदला मिळत नाही. म्हणून शेतकरी किती कष्ट घेत असतो हे दाखवून देण्यासाठी ऍपचा वापर करून त्यांच्या श्रमाची जाणीव करून घेतली. यावेळी शेतकरी बांधवांचे कष्ट खूप मोठे आहेत हे दिसून आले.
- किर्तीकुमार कुलकर्णी, शेतकरी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.