"महाविकासआघाडी'कडून शेतकऱ्यांची फसवणूक 

Farmers' fraud from "development front"
Farmers' fraud from "development front"

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच वेळी शेतकऱ्यांची फसवणूक तसेच राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन झाले. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जोरदार निदर्शने करून सरकारचा निषेध व्यक्त झाला. 

भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक म्हणाले, ""महाआघाडीबरोबर जाऊन शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्‍टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्‍टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण, महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आश्वासनाचा विसर पडला आहे.'' 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ""महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही.'' 

जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ""जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार स्थगिती सरकार आहे. 
भाजप सरकारने 43 लाख खातेधारकांना 19 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.'' 
सरचिटणीस अशोक देसाई यांनी, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात व्यस्त असल्याची टीका केली. 

दरम्यान, शिष्टमंडळातर्फे निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी माजी आमदार अमल महाडिक, गटनेते अजित ठाणेकर, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक विजय खाडे, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, नगरसेवक किरण नकाते, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, गणेश देसाई, किशोरी स्वामी, भारती जोशी, चंद्रकांत घाटगे, सरचिटणीस सुभाष रामुगडे, चिटणीस अनिल काटकर, नचिकेत भुर्के, सुलभा मुजूमदार, प्रवीणचंद्र शिंदे, भरत काळे, प्रदीप पंडे, माणिक पाटील-चुयेकर, अमोल पालोजी आदी उपस्थित होते. 

घोषणांनी परिसर दुमदुमला... 
"फसव्या महाविकास आघाडीचा धिक्कार असो', "शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे', "नारीशक्तीचा घात-बळीराजाचा विश्वासघात सहन केला जाणार नाही', "नारीशक्ती के सन्मान में- भाजप मैदान में' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com