शेतकरी कर्जमाफीची यादी 'या' तारखेला प्रसिद्ध...

farmers loan waiver will be announced
farmers loan waiver will be announced

कोल्हापूर - कर्जमाफीसाठी लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी शुक्रवारी (ता. २८) जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी आज येथे दिले. 

शासनाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी बायोमेट्रिक पध्दतीचा अवलंब  केला जाणार आहे. यासाठी आज राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात दोन दिवसांचे प्रशिक्षण झाले. आज याचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी आजरा, चंदगड, राधानगरी, गडहिंग्लज व  भुदरगड तालुक्‍यातील ग्रामपंचायत संगणक चालक, सरकार सुविधा केंद्रचालकांना प्रशिक्षण दिले. 

अमर शिंदे म्हणाले, कर्जमाफी योजनेसाठी लाभार्थी होण्यासाठी आधार कार्डचे प्रमाणीकरण केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मूळ कर्जाची माहिती घेतली जाईल. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या कर्ज योग्य असेल आणि संबधीत शेतकऱ्यांना ते मान्य असेल तर आधार कार्ड प्रमाणीकरण करावे. कर्जदार शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या जिल्हास्तरीय समितीकडे हे प्रकरण वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नवीन हंगामाचे पीक कर्ज वाटपाच्या सूचना

जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे.  बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरणाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण केले पाहिजे. बॅंकेच्या शाखेत येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. कर्जमुक्तीचे काम लवकर पूर्ण करुन शेतकजयांना नवीन हंगामाचे पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचनाही श्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी देसाई, राहुल माने, अशोक माने, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राहुल माने, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कार्यकारी संचालक अशोक माने 
उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com