ऊस तोडीणी कामगारंच्या "खुशाली'चा दर 5000 पर्यंत

Farmers In Trouble Due To Sugarcane Harvesting Workers Gadhinglaj Kolhapur Marathi News
Farmers In Trouble Due To Sugarcane Harvesting Workers Gadhinglaj Kolhapur Marathi News

आजरा : आजरा तालुक्‍यात उसाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हक्काचा आजरा साखर कारखाना बंद असल्यामुळे कोणी "ऊस नेता का ऊस' असे म्हणण्यांची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळेच "खुशाली' चा दर गगनाला पोहोचला आहे. तो आता प्रति लोड पाच हजार नजीक पोहचला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र इकडे आजरा साखर कारखान्याचे दुखणे कायम आहे. 

कोरोनामुळे जिल्ह्यात ऊस तोडणीच्या टोळ्या कमी आल्या. त्याचा परिणाम जिल्ह्यातील सर्व कारखान्याच्या ऊस तोडणी यंत्रणेवर झाला. त्यामुळे सर्वच कारखान्याकडे ऊस तोडणीची यंत्रणा अल्प आहे. ही पार्श्‍वभूमी एकीकडे असताना दुसरीकडे आजरा साखर कारखाना दोन वर्ष बंद आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही.

सध्या तालुक्‍यात अथणी शुगर्स तांबाळे कारखान्याच्या सर्वात जास्त 70 टोळ्या आहेत. दररोज 1200 टन ऊस अथनी शुगर्सकडे जात आहे. संताजी घोरपडे, बेडकिहाळ, हेमरस, गडहिंग्लज व अथर्व चंदगड या कारखान्यांच्या 40 टोळ्या आहेत. तालुक्‍यात 4700 हेक्‍टर इतके उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे सुमारे सव्वा तीन लाख टन ऊस उपलब्ध होता.

यापैकी पावणे दोन लाख इतक्‍या उसाची उचल झाली असून सुमारे दीड ते सव्वा लाख टन ऊस शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. परिस्थितीचा फायदा टोळ्या उचलीत असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांची चांगलीच लुट सुरू आहे. खुशालीचा दर गगनाला भिडला असून एक लोड उसाला पाच हजार रुपये इतकी खुशाली घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. 

"आजऱ्या'चा प्रश्‍न पवारांच्या मार्गे ठाकरेंकडे 
आजरा साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी अनेकांना साकडे घातले जात आहे. मुळातच साखर व्यवसाय अडचणीत असल्याचे कारण दाखवत आजरा सुरू करण्याबाबत निर्णय होवू शकलेला नाही. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार हे नुकतेच कोल्हापुर दौऱ्यावर येवून गेले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे व संचालक मंडळाने भेट घेत आजऱ्याचे दुखणे पवारांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून मार्ग काढण्यास सांगितले असून काही अडचण असल्यास मदत करू, असे सांगितले. 

शेतकऱ्यांनी जागे व्हावे.... 
"खुशाली" ला कंटाळून तालुक्‍यातील काही गावात शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडण्या तयार करून ऊस संपवले. शेतकरी जागा होत असल्याचे हे आशादायक चित्र आहे. इथून पुढे शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्याची गरज असून आपण पिकवलेला माल विकण्याची तयार ठेवावी असे जाणाकार सांगतात. 

खुशालीचा तीन महिन्यात वाढलेला दर 
नोंव्हेंबर - 800 ते 1000. 
डिसेंबर - 1800. 
जानेवारी - 3000 ते 5000. 

शेतकरी मेटाकुटीला
उसाची एकूण रक्कम दहा हजार रुपये असेल तर खुद्द तोडणीची खुशाली साधारण 13 हजार इतकी होते. त्यामुळे हा ऊस जनावरांना तोडून घालण्याखेरीज शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही. खुशालीच्या ओझ्याखाली शेतकरी मेटाकुटीला आला असून जनावरांच्या गोठेवाल्याशीं शेतकरी संपर्क करीत आहेत. 
- शंकर पाटील, शेतकरी, आजरा 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com