esakal | कोल्हापूर : बावड्यात पंधरा एकरातील उसाला आग 
sakal

बोलून बातमी शोधा

Fifteen acres of sugarcane fire in Bavda

उलपे मळ्यातील पांडुरंग पाणीपुरवठा योजनेवर परिसरातील शेकडो एकर क्षेत्र अवलंबून आहे.

कोल्हापूर : बावड्यात पंधरा एकरातील उसाला आग 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा - येथील उलपे मळा, सरवळ परिसरातील पंधरा एकरातील ऊसाला अचानक आग लागली. यात सुमारे 16 लाख रूपयांचे नुकसान झाले असून आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील यांच्यासह बावड्यातील श्रीराम सोसायटीच्या संचालकांनी आग लागलेल्या ऊसाची पाहणी करून जळालेला ऊस लवकरात लवकर गाळपाला नेण्याच्या सूचना दिल्या. 
आगीत कृष्णात उलपे, शरद उलपे, बाळासो उलपे, बबन उलपे, प्रशांत ठोंबरे, बाळासो उलपे, बाबासो उलपे, बाबासो उलपे, गणपती उलपे, दिलीप वाडकर, कृष्णात उलपे, नंदा प्रकाश जाखलेकर विकास उलपे, महादेव उलपे, श्रीकांत उलपे, बाबासो उलपे, अभिजीत उलपे, शांताबाई उलपे, दिनकर उलपे आदि शेतकर्यांच्या ऊस जळाला आहे. 

उलपे मळ्यातील पांडुरंग पाणीपुरवठा योजनेवर परिसरातील शेकडो एकर क्षेत्र अवलंबून आहे. याच परिसरातील सरवळ येथील उसाला काल (ता. 17) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली, वाऱ्याच्या वेगाने ही आग आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात पसरली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले पण पाणंदीच्या रस्त्यांमुळे आग लागलेल्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यात अडचण येत होती. आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांबरोबर शेतकऱ्यांनीही पुढाकार घेतला. दुपारी दीडच्या सुमारास लागलेली आग अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्‍यात आली. 

राजाराम कारखान्याचे शेती अधिकारी यांच्याशी चर्चा करून जळीत झालेला ऊस लवकरात लवकर तोड करून न्यावा अशी विनंती आमदार जाधव व पाटील यांनी कारखाना प्रशासनाला केली. तलाठी राजू कोरे व कोतवाल सर्जेराव काळे मंगळवारी उशिरापर्यंत पंचनामा करत होते.  

संपादन - धनाजी सुर्वे