'या' सीमा तपासणी नाक्यावरुन 51 हजार 632 प्रवाशांना कर्नाटकात दिला प्रवेश...

अनिल पाटील
Friday, 29 May 2020

दुधगंगा नदीवर वाहनांची तपासणी करुन पुढे सीमा तपासणी नाक्यावर सोडण्यात येतात. या ठिकाणी ई-पास व आरोग्य तपासणी करुन पुढे टोल नाक्यावर सोडण्यात येते.

कोगनोळी (बेळगाव) - राष्ट्रीय महामार्गावर येथे असणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावरुन आतापर्यंत १२ हजार ३२२ वाहनातून ५१ हजार ६३२ प्रवाशांना प्रवेशांना कर्नाटकात प्रवेश दिला आहे. राज्य बंदीमुळे येथील गर्दी झाली असल्याची माहिती निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनाईक यांनी दिली.

येथील दुधगंगा नदीवर वाहनांची तपासणी करुन पुढे सीमा तपासणी नाक्यावर सोडण्यात येतात. या ठिकाणी ई-पास व आरोग्य तपासणी करुन पुढे टोल नाक्यावर सोडण्यात येते. तेथे सर्व कागदपत्रे, आलेले व पोहोचण्याचे ठिकाण याची चाचपणी करुन संबंधित जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना कळवून वाहने सोडण्यात येत आहेत.

वाचा - बाप रे ! कोरोना काॅरंन्टाईन कक्षातच घुसला अस्सल नाग.... मग पुढे...

या ठिकाणाहून सोडण्यात येणाऱ्या लोकांना शासकीय अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनाईक, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, एएसआय एस. ए. टोलगी यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

नाक्यावरील बंदोबस्तही कमी

ई-पास सेवा बंद झाल्याने कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची गर्दी कमी झाली आहे. परिणामी गेल्या चार दिवसांमध्ये कमी लोकांनी कर्नाटकात प्रवेश केला आहे.
त्यामुळे या ठिकाणी असणारा बंदोबस्तही कमी करण्यात आला आहे.

नाक्यावरून गेलेली वाहने व प्रवासी

  • एकूण वाहने - १२३२२
  • एकूण प्रवासी - ५१६३२
  • कर्नाटक राज्यात गेलेली वाहने - ४८९८
  • कर्नाटक राज्यात गेलेले प्रवासी - २०२१४
  • परराज्यातील गेलेली वाहने - ७४२४
  • परराज्यात गेलेले प्रवासी - ३१४१८

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty one thousand passengers admitted to Karnataka from Kognoli check post