धक्कादायक ; क्वारंटाईन सेंटरमध्येच फिल्मी स्टाईलने हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

शहराच्या मध्य वस्तीतील भाजी मार्केटमधील सेंटरमध्ये हा प्रकार घडल्याने नागरिकांत याबाबत जोरदार चर्चा होती.

मलकापूर (कोल्हापूर) - येथील भाजी मार्केटमधील क्वारंटाईन सेंटरमधील चौघांमध्ये रात्री उशिरा जोरदार हाणामारी झाली. शहराच्या मध्य वस्तीतील भाजी मार्केटमधील सेंटरमध्ये हा प्रकार घडल्याने नागरिकांत याबाबत जोरदार चर्चा होती. मद्यप्राशन केल्याने ही घटना घडली असावी, अशीच  चर्चा सर्वत्र आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येथील शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या नवीन भाजी मार्केट इमारतीत मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यातून आलेल्या पुरुषांना, तर सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीत महिलांना संस्थांत्मक क्वारंटाईन केले आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील एक पुरुष कर्मचारीही येथे क्वारंटाईन आहे. सोमवारी रात्री उशिरा या कर्मचारी आणि क्वारंटाईन असणारा येथील एक व्यापारी आणि त्यांची दोन मुले यांच्यात वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. सेंटर मध्यवस्तीतच असल्याने शिवीगाळ आणि मोठमोठ्या आवाजाने शेजारील नागरिक जमा झाले. पालिका प्रशासनाला नागरिकांनी याबाबत कळवले. तडजोडीने वाद तात्पुरता मिटला आहे. 

हे पण वाचा - ... फक्त एवढेच शेतकरी ठरणार कर्जमाफीस पात्र ; या आहेत अटी

हे पण वाचा - कोल्हापुरात 9 दिवसात कधी,किती, कसे सापडले कोरोना पाॅझिटिव्ह ? वाचा ग्राफिक्सच्या माध्यमातून... 

घडलेली घटना वाईट आहे. पालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. प्रशासनाचा बेजबाबदारपणा याला कारणीभूत आहे.
- अमोल केसरकर, नगराध्यक्ष, मलकापूर पालिका

क्वरंटाईन सेंटरमध्ये हाणामारी झाल्यानंतर मी लगेचच पालिका मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मेडिकल करून चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने हे प्रकरण दडपले आहे. हे चुकीचे आहे.
- बाबासाहेब पाटील, विरोधी पक्षनेते, मलकापूर पालिका
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filmy style fighting in quarantine center at kolhapur