व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयांची आर्थिक कोंडी

Financial Dilemma Of Vocational Courses Colleges Kolhapur Marathi News
Financial Dilemma Of Vocational Courses Colleges Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी, तंत्रनिकेतन आदी व्यावसायिक अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये थकीत शिष्यवृत्तीमुळे आर्थिक अरिष्टात सापडली आहेत. 

खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने या महाविद्यालयांवर आर्थिक ताण पडत आहे. कोरोनामुळे एका बाजूला प्रवेश लांबले असताना यात शिष्यवृत्तीही मिळत नसल्याने महाविद्यालये चिंतातूर बनली आहेत. वेतनासह अन्य अडचणींवर मात करताना महाविद्यालयांना कसरत करावी लागत असून, राज्यातील अनेक महाविद्यालये शिष्यवृत्तीअभावी या चक्रव्यूहातून वाटचाल करत आहेत. 

अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी, तंत्रनिकेतन आदींचा व्यावसायिक अभ्यासक्रमात समावेश आहे. सामाजिक न्याय विभागाकडून व्यावसायिक अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांना दरवर्षी शैक्षणिक शुल्क स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. यावरच महाविद्यालयांच्या प्रपंच बहुतांश प्रमाणात सुरू असतो.

दोन टप्प्यात शिष्यवृत्ती मिळत असते. काही महाविद्यालयांना 2019-20 या शैक्षणिक वर्षातील पहिला हप्ता मिळाला आहे. मात्र, दुसऱ्या हप्त्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. काही महाविद्यालयांना अद्याप पहिलाही हप्ताही मिळाला नसल्याने अशा महाविद्यालयांची अवस्था बिकट बनली आहे. 

कोरोनातील संपूर्ण पगार द्या, असे शासनाने ठणकावले असले तरी दुसरीकडे मात्र शिष्यवृत्तीही महाविद्यालयांना दिली नसल्याने शासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे महाविद्यालयांची कोंडी झाली आहे. पगाराच्या मागणीवरुन अनेक ठिकाणी आंदोलनांचेही प्रसंग उद्‌भवले आहेत. शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे पगात थकले आहेत. संपूर्ण पगार द्या, असे फर्मावताना शासनाने महाविद्यालयांनाही शिष्यवृत्ती आदा करणे गरजेचे होते. शिष्यवृत्ती थकल्याने महाविद्यालयांची कसरत सुरू असून शासनाने तातडीने शिष्यवृत्ती दिल्यास आर्थिक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. 

दिरंगाई शासनाची; वाद संस्था-प्राध्यापकांचा 
कोरोना काळातील संपूर्ण पगार प्राध्यापकांना द्यावा, असे शासनाने सांगितले आहे. मात्र, शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांच्या खात्यात जमा झाली तरच हा प्रश्‍न काहीसा मार्गी लागणार आहे. पगार देण्याचे आदेश देणाऱ्या शासनाला शिष्यवृत्तीचीही जाणीव असली पाहिजे. शिष्यवृत्ती थकल्याने महाविद्यालयांपुढे अनेक समस्या उभ्या असून पगारावरुन संस्था आणि प्राध्यापक, कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com