esakal | कोल्हापूर : हातकणंगलेत कारखान्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

बोलून बातमी शोधा

fire on industrial boiler in hatkanangale 12 crore dames kolhapur}

10 लिटर्सचा ऑईलचा टँक आणि सुमारे 40 टन दगडी कोळशाला आगीने घेरल्यामुळे आग वाढतच गेली.

कोल्हापूर : हातकणंगलेत कारखान्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
sakal_logo
By
अतुल मंडपे

हातकणंगले (कोल्हापूर) : येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याच्या बॉयलरला आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. या आगीत सुमारे 10 ते 12 कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बॉयलरच्या ठिकाणी असलेल्या सुमारे 10 लिटर्स ऑईलचा टँक आणि सुमारे 40 टन दगडी कोळशाला आगीने घेरल्यामुळे आग वाढतच गेली.

हेही वाचा - कोविड खरेदीची कॅगमार्फत चौकशी करा ; कोल्हापूर जिल्हा परिषदेत सदस्यांची मागणी -

आगीची माहिती मिळताच संबंधित कारखाना प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. त्यावरून इचलकरंजी नगरपालिकेचे 2, संजय घोडावत उद्योगसमूह 1, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना 1 असे एकूण 8 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न  केले. या 7- 8 अग्निशामक पाण्याच्या बंबानी अनेक फेऱ्या करुनही दुपारी दोनपर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. या घटनेत बॉयलर विभागाचे पत्रे जळून खाक झाले आहेत. आगीच्या धुराचे लोट सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पसरले होते. या आगीमध्ये सुमारे 10 ते 12 कोटींचे नुकसान झाल्याचे प्रथमिक अंदाज आहे.

संपादन - स्नेहल कदम