शाहूवाडीत रस्त्यावर मारला जळाऊ लाकडाचा डेपो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

धाऊरवाडा (ता. शाहूवाडी) येथील धोपेश्‍वर मंदिरापासून दोन किलोमीटरवर जंगली व इतर वृक्षांची बेकायदेशीर तोड करण्यात आली आहे. यात सुमारे दहा ते पंधरा ट्रक कापलेली झाडे आहेत.

कोल्हापूर : धाऊरवाडा (ता. शाहूवाडी) येथील धोपेश्‍वर मंदिरापासून दोन किलोमीटरवर जंगली व इतर वृक्षांची बेकायदेशीर तोड करण्यात आली आहे. यात सुमारे दहा ते पंधरा ट्रक कापलेली झाडे आहेत.

शाहूवाडी तालुक्‍यात बेसुमार वृक्षतोड झाली आहे. ही वृक्षतोड कोणी केली, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यात विविध प्रकारची झाडे आहेत. ही वृक्ष वन विभागातील आहेत की खासगी आहेत, याचा छडा लागलेला नाही. खासगी असतील तर त्याची परवानगी घेतली होती का? वन विभागाची असतील तर यावर वन विभागाचा कोणत्याही प्रकारचा शिक्का नाही. अशा पद्धतीने सुमारे दहा ते पंधरा ट्रक भरतील एवढी वृक्षसंपदा तोडून रस्त्याकडेला टाकलेली आहे. तीन झाडांचे डेपो मारून ठेवले आहेत. ही झाडे काही दिवसांपूर्वीच कापली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारी ही झाडे कोणाची आहेत, ही वृक्षतोड करण्यासाठी कोणी परवानगी दिली, ही माहिती गुलदस्त्यात आहे. त्यामुळे, वन विभाग ही वृक्षतोड कोणी केली, याला परवानगी कोणी दिली याचा छडा लावणार का, असा सवाल केला जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A firewood depot hit the road in Shahuwadi