गडहिंग्लजला पूरग्रस्तांची धरणे

Flood Affected Demonstrations in Gadhinglaj
Flood Affected Demonstrations in Gadhinglaj

गडहिंग्लज : अतिवृष्टी व महापूराचा फटका बसलेल्या तालुक्‍यातील पूरग्रस्तांनी आज धरणे आंदोलन केले. येथील प्रांत कार्यालयासमोर पूरग्रस्तांच्या एकजुटीचा गजर करण्यात आला. यामाध्यमातून पूरग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांचा पाठपुरावा केला. घटप्रभा खोरे पूरग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

तालुक्‍यातील पूरग्रस्त सकाळी अकरापासून लक्ष्मी देवालयात जमायला सुरवात झाली. तेथून दुपारी बाराला मोर्चाला सुरवात झाली. बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्‍वर मार्ग, मुख्य मार्गावरुन मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. या ठिकाणी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पूरग्रस्तांनी धरणे धरली. पूरग्रस्तांच्या एकजुटीचा..., आमच्या मागण्या मान्य करा..., उद्‌धव सरकार जागे व्हा... आदी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. 

संपत देसाई म्हणाले, ""नुकसान भरपाई ही पूरग्रस्तांचे देणे आहे. ती मागण्यासाठी प्रांत कार्यालयाच्या दारात आलो आहोत. शासनाकडून संवेदनशील पद्धतीने पुनर्वसन होताना दिसत नाही. शासनासह स्थानिक प्रशासनाला त्याबाबत कळवळा नसल्याचेच यातून दिसून येत आहे. प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन झाले पाहिजे.'' मनोहर दावणे, रमजान अत्तार, विद्या हेवाळे, प्रशांत देसाई यांचीही भाषणे झाली. 

दरम्यान, आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची भेट घेतली. शिष्टमंडळातील देसाई, अत्तार, देसाई, दावणे, रेखा लोहार, विद्या हेवाळे, प्रकाश मगदूम, नंदा रेगडे, वसंत नाईक यांनी पांगारकर यांच्यासमोर पूरग्रस्तांचे प्रश्‍न मांडले. पांगारकर यांनी त्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

पूरग्रस्तांची नोंदवही करा... 
संपत देसाई म्हणाले, ""देशात नागरीक नोंदणी कायदा लागू केला आहे. तर पूरग्रस्तांची नोंदणी करायला काय हरकत आहे. पूरग्रस्तांचीही गावनिहाय नोंदवही तयार करावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com