प्रवीणसिंह पाटील गट रविवारी ‘राष्ट्रवादी’त करणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास 
ठेवून मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.

मुरगूड (कोल्हापूर)  : येथील माजी नगराध्यक्ष व ‘बिद्री’चे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील कार्यकर्त्यांसह रविवारी (ता. ८) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्‍वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी दिली.यावेळी माजी नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे, रेखा सावर्डेकर प्रमुख उपस्थित होत्या.

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास 
ठेवून मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील 
यांच्या अध्यक्षतेखाली ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

हेही वाचा- Success Story : दहा गुंठ्यांत पानमळा पिकवून झाला लखपती -

पत्रकार परिषदेला ॲड. सुधीर सावर्डेकर, राजू आमते, माजी नगरसेवक नामदेव भांदिगरे, जगन्नाथ पुजारी, संपत कोळी, 
राजेंद्र चव्हाण, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, दिग्विजय चव्हाण उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former mayor and senior director of Bidri Praveen Singh Patil Congress enter the party