बिग ब्रेकिंग - राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा ; दूध संघाला नोटीस...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

विविध मागण्यांसाठी श्री शेट्टी यांनी मंगळवारपासून ( .21 )दूध बंद आंदोलन पुकारले आहे.

कोल्हापूर : दुधाला अनुदान मिळावे यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे कोल्हापूर जिल्हा दूध संघ अडचणीत आला आहे.संकलन बंद केल्यास सहकार कायद्यांतर्गत कारवाई करू असा इशारा दूध उपनिबंधक गजेंद्र देशमुख यांनी एका नोटिशी द्वारे गोकुळा दिला आहे.

हेही वाचा - कोल्हापूरमध्ये  लॉकडाऊनला झाली सुरुवात अन्  पहाटे रस्त्यावरच तरूणांचा डान्स ; पोलिसांनकडून लाठ्यांचा प्रसाद -

दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, दूध पावडर ला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी श्री शेट्टी यांनी मंगळवारपासून ( .21 )दूध बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गोकुळ दूध संघाने उद्या सकाळचे संकलन बंद ठेवून पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून दूध उपनिबंधकांनी ही नोटीस बजावली आहे.

हेही वाचा - ब्रेकिंग - कोल्हापूरात सोमवारी दुपारपर्यत ६६ रुग्ण बाधित ; संख्या पोहचली  2320 वर... -

  कोल्हापूर जिल्हा दूध संघाने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लाखो लिटर दुधाचे संकलन बंद होणार आहे. दरम्यान उपनिबंधकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर दूध संघ कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MP Raju Shetty decision Tomorrow stop milk agitation in kolhapur