मुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांची पोलिसात खूनाची तक्रार ; सासरच्या चार जणांना अटक 

four people arrested in women suicide case belgaum
four people arrested in women suicide case belgaum

बेळगाव : सुळगा (हिं.) येथील महिलेचा सासरच्या मंडळीनी खून करुन तीने आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून चौघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (ता.6) काकती पोलिसांनी ही कारवाई केली. सासरा निंगाप्पा गुंडू शहापूरकर (वय 70), सासू लक्ष्मी गुंडू शहापूरकर (वय 61), दीर उमेश निंगाप्पा शहापूरकर (वय 35) आणि जाऊ लता उमेश शहापूरकर (वय 30, सर्वजण रा. सुळगा हिं.) अशी त्यांची नावे आहेत. 

अटक करण्यात आलेल्या संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. 

गीतांजली जोतीबा शहापूरकर (वय 38, रा. सुळगा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 7 जून रोजी गीताजंली हीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणी काकती पोलिसांनी आत्महत्या अशी नोंद करुन घेतली होती. पण, तब्बल दोन महिन्यानंतर या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. आपल्या मुलीचा खून झाल्याची फिर्याद गीताजंली यांचे वडील वासू यादो मायाण्णा यांनी मंगळवार (ता.4) पोलिसात दिल्याने काकती पोलिसांनी तपास गुन्हा दाखल करुन संशयितांचा शोध चालविला होता.

संशयावरू आज चौघांनाही अटक करुन त्यांची जिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर कारवागृहात रवानगी करण्यात आली. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर अधिक तपास करीत आहेत.
 
संपादन- धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com