बालभारतीत नोकरीच्या अमिषाने फसवणूक  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

आता आणखी एका फिर्यादीमुळे आणखी दोघां तरुणांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.

कोल्हापूर - "बालभारती' या शासनाच्या अस्थापनेमध्ये लिपिक म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने सख्या चुलत भावांची पाच लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद शाहूुपुरी पोलिस ठाण्यात झाली. अविष्कार पाटील (रा.बी.डी.डी.चाळ जांबोरी,मैदान, वरळी, मुंबई) या संशयितावर गुन्हा दाखल झाला. चार दिवसापूर्वीच अविष्कारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आता आणखी एका फिर्यादीमुळे आणखी दोघां तरुणांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
 
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी सचिन बंडू जाधव हा मुळ (खोपटी, तंडा, जातेगाव ता.गेवराई, जि.बीड) येथील आहे. सध्या तो केव्हिज पार्कमध्ये राहतो. शिक्षण घेत असलेल्या या तरुणानाची फेब्रुवारी 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 दरम्यान संशयित आरोपीची सचिन बरोबर ओळख झाली. तेंव्हा तोही कोल्हापुरात होता. फिर्यादी सचिन त्याचा चुलत भाऊ विकास पांडु जाधव या दोघांना बालभारतीमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो असे अविष्कारने सांगितले.

हे पण वाचा - `माऊलीं`ची पालखी अोढणार खडकलाटची बैलजोडी

दोघांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी गुगल पे, आर.डी.टी.एस. व रोखीने असे एकूण 5 लाख 80 हजार रुपये फिर्यादी सचिन व त्याच्या चुलत भाऊ विकास यांच्याकडून घेतले. मात्र नोकरी न लावता तो पळून गेल्यामुळे फिर्यादी सचिव व विकास यांना फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आज नोकरीच्या अमिषाने 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाला.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud for job greed in Balbharati