बापरे; तुम्ही तरी असे फसू नका! मोबाईल कंपनीतून बोलला अन् घातला तब्बल एवढ्या लाखाला गंडा

Fraud of twenty lakh rupees case in kolhapur
Fraud of twenty lakh rupees case in kolhapur

कोल्हापूर - मोबाईल कंपनीतून बोलतोय, कार्ड फोर जी करायचे आहे... असे सांगून भामट्याने मोबाईल क्रमांक व बॅंक माहितीच्या आधारे 19 लाख 67 हजाराहून अधिक रक्कमेचा एकाला गंडा घातला. याची नोंद सायबर पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद श्रीनिवास रामचंद्र जोशी (वय 54, रा. साळोखे पार्क) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीनिवास जोशी हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. लॉकडाऊनमुळे सध्या ते घरी आहेत. त्यांना 8 मे रोजी सकाळी 11 वाजता भामट्याचा फोन आला. भामट्याने मोबाईल कंपनीतून बोलतोय, "तुमचे थ्रीजी कार्ड फोरजी करायचे आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर लिंक पाठवतो. त्यावर क्‍लिक करून "येस' म्हणा' असे सांगितले. त्यानुसार जोशी यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेऊन लिंकवर क्‍लिक करून त्याच्या सांगण्याप्रमाणे केले. त्यानंतर भामट्याने त्यांना तुमचे कार्ड बंद होऊन 48 तासानंतर 4 जी कार्ड सुरू होईल असे सांगितले. लिंकद्वारे मिळालेल्या मोबाईल क्रमांक व बॅंक खात्याबाबतच्या माहिती आधारे भामट्याने त्यांच्या खात्यावरील सुमारे दोन लाख रूपये परस्पर काढून घेतले. हा प्रकार जोशी यांच्या लक्षात आला. दरम्यान, बॅंकेला सुट्टी असल्याने त्यांना याची खात्री करता आली नाही. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर भामट्याने 14 मे अखेर त्यांच्या नावे बॅंकेतून 18 लाखांचे गृह कर्ज ऑनलाईन मंजूर करून ती रक्कम परस्पर काढूनही घेतली. हा प्रकार जोशी यांच्या लक्षात आला. त्यांनी बॅंकेशी याबाबत खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी 19 लाख 67 हजार 622 रूपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद सायबर पोलिस ठाण्यात दिली. मोबाईल क्रमांकानुसार भामट्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 

18 लाखांच्या गृहकर्जाची उचल 
बॅंकेला लिंक असणारा मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्या संबधी माहिती आधारे भामट्याने अवघ्या दोन दिवसात 18 लाखांचे गृह कर्ज मंजूर कसे मंजूर करून घेतले. त्या कर्जाची रक्कम त्याने परस्पर कशी काढून घेतली. हे कर्ज आधीच मंजूर झाले होते का? त्याची माहिती भामट्याला कशी मिळाली याबाबतचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. 

मोबाईल कंपनीतून बोलतो असा बहाणा करणारे भामटे मोबाईल क्रमांकाद्वारे बॅंक खात्याची माहिती मिळवू लागलेत. त्याआधारे खात्यावरील रक्कमच नव्हे तर संबधितांच्या ठेवीही काढून घेऊ लागलेत. आता त्यांची मजल मोठ्या कर्जाची उचल करून लाखोंचा गंडा घालण्यापर्यंत पोहचली आहे. अशा भामट्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे. असा प्रकार कोणी करत असेल तर त्याची तक्रार तातडीने सायबर पोलिस ठाण्यात करावी. 
-संजय मोरे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com