
नाईट लॅंडिंग सुविधा सुरु झाल्यास मुंबईसह इतर प्रमुख शहरात विमानसेवा सुरु होण्यास खूप मोठी मदत होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरातील विमानसेवा सक्षम होण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज केली.
नाईट लॅंडिंग सुविधा सुरु झाल्यास मुंबईसह इतर प्रमुख शहरात विमानसेवा सुरु होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. सध्या मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी कोल्हापूर-मुंबई व मुंबई ते कोल्हापूर सकाळच्या सत्रात सेवा देता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. यात नाईट लॅंडिगमूळे याला खूप मोठी मदत होणार आहे.
महाविकास आघाडीने यावर्षी दुसरा अर्थसंकल्प सादर केला.
यामध्ये कोल्हापूर विमानातळाला नाईट लॅंडिंगसाठी भरीव निधी देण्याची घोषणा करुन कोल्हापूरवासियांना दिलासा दिला आहे. सध्या, कोल्हापूर-हैद्राबाद, तिरुपती विमानसेवेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यातच नाईट लॅंडिंग सुविधा मिळावी यासाठी वारंवार मागणी होत होती. नाईट लॅंडिग सुविधा नसल्याने विमानसेवेला अडथळे येत आहेत. यासाठी नाईट लॅंडिंगसाठी विशेष निधीची गरज होती. हा निधी आज मंजूरी देण्यात आली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे