कमी आवकेमुळे गडहिंग्लजला फळभाज्या तेजीत

Gadhinglaj Found Vegetables Expensive Kolhapur Marathi News
Gadhinglaj Found Vegetables Expensive Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील बाजारात सोयाबीनची नवी आवक सुरू झाली आहे. कमी आवक आणि मागणी जास्त झाल्याने फळ आणि पालेभाज्या तेजीतच आहेत. अजून महिनाभर ही स्थिती राहण्याची शक्‍यता आहे. फळांना मागणी अधिक असल्याने दर टिकून आहेत. दहा दिवस जनता कर्फ्यू गुरुवारी (ता. 17 ) संपला. तेव्हापासून भाजी मंडईत मागणी वाढली आहे. तुलनेत यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मुळातच पालेभाज्या, फळभाज्यांचे उत्पादन घटले आहे.

साहजिकच याचा परिणाम म्हणजे दर तेजीत आहेत. टोमॅटो, दोडका, बिन्स यांचे दर वाढले आहेत. कोथिंबिरीचा दर पुन्हा वाढला आहे. घाऊक बाजारात शंभर पेंढ्याना 1200 तर किळकोळ 20 रुपये पेंढी असा दर आहे. शेपू 10 ते 15 रुपये पेंढी आहे. दहा किलोचे दर असे ः कोबी 100, टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी 300, ढब्बू, बिन्स, दोडका 400 रुपये. 

सोयाबीनची नवी आवक सुरू झाली आहे. पावसामुळे ओला सोयाबीन विक्रीला येत असल्याचे व्यापारी मल्लिकार्जुन बेल्लद यांनी सांगितले. क्विंटलचा 3750 रुपये असा दर आहे. भुईमूग, मक्‍याची आवक अद्याप बंद आहे. फळबाजारात सफरचंदाची आवक कायम आहे. शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंत दर्जानुसार दर आहेत. मोसंबी 60 ते 80 रुपये किलो आहेत. डाळिंब 60 रुपये किलो आहे. बटाटा इंदूर 3200 ते 3600, आग्रा 2800 ते 3000 रुपये क्विंटल आहे. स्थानिक तालुक्‍यातील ग्रामीण भागातून बटाट्याची नवी आवक सुरू आहे. त्याला मागणीही आहे. 20 ते 30 रुपये किलो असा दर आहे. लसणाचे भाव 75 ते 150 रुपये किलो असे आहेत. 

जुन्या कांद्याला मागणी 
कांद्याची नवी आवक सुरू असली तरी पावसामुळे प्रत चांगली नाही. त्यामुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात नवा कांदा 500 ते 2500, तर जुना 1500 ते 3200 रुपये क्विंटलचा दर आहे. किळकोळ बाजारात दर्जानुसार 10 ते 40 रुपये असा दर असल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. 

किरकोळ दर 
कोथिंबिर......20 रुपये पेंढी 
शेपू........10 ते 15 रुपये पेंढी 
कोबी....100 (दहा किलो) 
टोमॅटो, मिरची, वांगी.....300(दहा किलो) 
ढब्बू, बिन्स, दोडका.......400(दहा किलो) 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com