गडहिंग्लज युनायटेडला उपविजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने राज्यस्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. रोख दहा हजार रुपये आणि प्रतिष्ठेची एसव्हीजेसिटी ट्रॉफी देऊन संघाचा गौरव करण्यात आला. युनायटेडचा आघाडीपटू आयर्न दळवीने लक्षवेधी तीन गोल केले. डेरवन (ता. चिपळूण) येथे एसव्हीजेसिटी स्पोर्टस अकॅडमीतर्फे झालेल्या या स्पर्धेत मुंबई, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव आणि रत्नागिरी येथील सतरा संघ सहभागी होते. 

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने राज्यस्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. रोख दहा हजार रुपये आणि प्रतिष्ठेची एसव्हीजेसिटी ट्रॉफी देऊन संघाचा गौरव करण्यात आला. युनायटेडचा आघाडीपटू आयर्न दळवीने लक्षवेधी तीन गोल केले. डेरवन (ता. चिपळूण) येथे एसव्हीजेसिटी स्पोर्टस अकॅडमीतर्फे झालेल्या या स्पर्धेत मुंबई, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव आणि रत्नागिरी येथील सतरा संघ सहभागी होते. 

साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीने ही सहा दिवस स्पर्धा झाली. पहिल्या सामन्यात युनायटेडने रत्नागिरीच्या पटवर्धन स्कूलचा पाच गोलने दणदणीत पराभव केला. यात आयर्न दळवींनी 2-2, तर महेश पवार आदित्य चांदेकर आणि सुशांत कांबळे यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात युनायटेडने मुंबईच्या वुसा प्रशालेवर दोन गोलने मात केली. युनायटेडच्या आदित्य चव्हाण हे दोन्ही गोल नोंदविले. 

उपांत्य पूर्व फेरीत तुषार लगरखंडेच्या निर्णायक गोलच्या जोरावर युनायटेडने यजमान एसव्हीजेसिटी स्पोर्टस अकॅडमीला नमवुन आगेकूच केली. उपांत्य फेरीत युनायटेड फुटबॉल स्कूलने वसईच्या विद्याविकासनीला एका गोलने हरवुन अंतिम फेरी गाठली. आयर्न दळवींने सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला महत्वपूर्ण गोल नोंदवुन संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात युनायटेडला बेळगाव विजया अकादमीच्या शोएब किल्लेदारने उत्तरार्धात मारलेल्या दोन गोलमुळे पराभव पत्करावा लागला. 

उपविजेता संघ असा 
सौरभ मोहिते, विनायक हालसोडे, सुशांत कांबळे, तुषार लगरखाडे, पियुष पाटील, आयर्न दळवी, अवधूत चव्हाण, राम कुंभार, अथर्व पाटील, ऋषिकेश चव्हाण, अथर्व कुंभार, अनिकेत डोमणे, आदित्य मांडे, तुषार कांबळे, महेश पोवार, आदित्य चांदेकर, शुभम नलवडे, ओंकार सांगलीकर. प्रशिक्षक दीपक कुपन्नावर, संघ व्यवस्थापक यासीन नदाफ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj United Runners-up Kolhapur Marathi News