गडहिंग्लजचे तीन युवक बॉलबॉईज

दीपक कुपन्नावर
Friday, 4 December 2020

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंन्ट लिमिटेडतर्फे (एफएसडीएल) गोव्यात गेल्या महिन्यापासून इंडियन सुपर लिग (आयएसएल) फुटबॉल सुरू झाली आहे.

गडहिंग्लज : अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंन्ट लिमिटेडतर्फे (एफएसडीएल) गोव्यात गेल्या महिन्यापासून इंडियन सुपर लिग (आयएसएल) फुटबॉल सुरू झाली आहे. या स्पर्धेत येथील चेतन सुतार, आदित्य रोटे, साकिब मणियार या तरुण फुटबॉलपटूंना बॉलबॉईज म्हणुन काम करण्याची संधी मिळाली आहे. परिणामी, फुटबॉल वेड्या गडहिंग्लजकर तरुणांना आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंचा खेळ अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 

यंदा आयएसएलचा सातवा मोसम विनाप्रेक्षक गोव्यात सुरू आहे. स्पर्धेत एटीके मोहन बागान, ईस्ट बंगाल, केरला ब्लास्टर्स, मुंबई सिटी, हैद्राबाद, आडीसा, गोवा, नॉंर्थ ईस्ट युनायटेड, जमशेदपुर, बंगलुरु, चेन्नईन एफसी असे अकरा संघ सहभागी आहेत. 

दरवर्षी नवोदित शालेय विद्यार्थ्यांनाचबॉंलबॉंईज म्हणून संधी दिली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा सुरक्षित बायो बबलमध्ये होत असल्याने लहान विद्यार्थ्याऐवजी तरूणांना ही जवाबदारी दिली आहे. मैदाना बाहेर गेलेला फुटबॉंलमुळे वेळ वाया जाऊ नये यासाठी बॉंलबॉंईज कार्यरत असतात. तिघेही स्थानिक मास्टर स्पोट्‌स, काळभैरव एफसी संघातून खेळतात. मुळातच गडहिंग्लज हे फुटबॉलवेडे म्हणून आळखले जाते. अनेक फुटबॉंलपटूंनी टॅंलेन्टच्या जोरावर चेन्नई, गोवा, मुंबई येथे नोकरीला लागले आहेत.

या पार्श्‍वभूमिवर आयएसएलमध्ये येथील तरुण फुटबॉलपटूंना मिळालेली बॉंलबॉंईज म्हणुन मिळालेली संधी अनोखी आहे. बॉंलबॉंईज म्हणुन मानधन मिळत असलेतरी आंतरराष्ट्रीय फुटबॉंलपटूंचा खेळ जवळून पाहण्याची पर्वणी महत्वाची आहे. यापूर्वी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या अनिकेत कोले, सागर पोवार आणि सुलतान शेख यांनी बंगलोरमध्ये आयएसएल स्पर्धेत दोन वर्षे बॉल बॉईज म्हणून काम केले आहे. 

शिकायला मिळत आहे
भारतीय फुटबॉलमधील अव्वल समजल्या जाणाया आयएसएलचा भाग होण्याची संधी मिळाली आहे. आज अखेर टिव्हीवर पाहिलेल्या दिग्गज खेळाडूंचा खेळाचा साक्षीदार होता आले. या सामन्यातुन खुप शिकायला मिळत आहे. 
- चेतन सुतार 

 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj's Three Young Ballboys Kolhapur Marathi News