मिनी लवासाला पुन्हा यायचे नाही म्हणत विझल्या तीन दगडांच्या चुली

Gaganbawda police and Tandoor gram panchayat took action against amateur tourists meal on the banks of Andur lake in Gaganbawda taluka
Gaganbawda police and Tandoor gram panchayat took action against amateur tourists meal on the banks of Andur lake in Gaganbawda taluka

साळवण (कोल्हापूर)  : गावागावात पोहोचलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. काही मोजक्‍या जनतेच्या निष्काळजीपणाने कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्‍यातील अणदूर तलावाच्या काठी जेवणावळी करणाऱ्या हौशी पर्यटकांवर गगनबावडा पोलिस व अणदूर ग्रामपंचायतीने कारवाई करत त्यांना समज देऊन सोडले.
अणदूर येथील तलाव हा मिनी लवासा म्हणून ओळखला जातो.

शनिवार-रविवार या आठवड्याच्या सुटीदिवशी येथे जेवणावळीसाठी पर्यटकांची गर्दी असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून लॉकडाउन असल्याने तालुक्‍यात पर्यटनबंदी आहे. लॉकडाउन शिथिल करण्यास सुरुवात केली असली तरी पर्यटनस्थळे, मंदिरे आणखी काही बाबी अद्यापही शिथिल नाहीत. 


पर्यटन क्षेत्रामध्ये जाण्यास बंदी असूनही काही हौशी पर्यटक पार्टी करण्यासाठी काही ना काही उठाठेवी करून जात आहेत.
रविवारी अणदूर तलावाकाठी जेवणावळी रंगल्याची माहिती स्थानिक लोकांना मिळाली. कोरोना दक्षता कमिटीच्या लोकांनी गगनबावडा पोलिसांना ही माहिती कळवली. कोरोनाचे गांभीर्य, बाहेरच्या लोकांचा प्रवेश धोकादायक आहे.

गर्दी पाहता जमलेल्या पर्यटकांना आवर घालण्यासाठी म्हणून साळवण पोलिस ठाण्यातील पोलिस जयदीप वीर, होमगार्ड योगेश शेलार, सरपंच दत्तात्रय गुरव, पोलिसपाटील आनंदा गुरव, मांडुकली ग्रामस्थ संदीप पाटील, जयसिंग पडवळ यांच्यासह ग्रामस्थांनी पर्यटक जेवण बनवत होते तेथे जाऊन ‘पुन्हा इकडे याचे नाही, सार्वजनिक मालमत्तेवर जेवणावळी करण्यास कोणी परवाना दिला आहे,’ असे खडसावताच पर्यटकांनी माफी मागितली तर काहींनी पळ काढला.परिसरातील फार्महाऊसच्या मालकांना याबाबत समज दिली. त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com