स्फोटात डोळ्यादेखेत संपूर्ण घर जळून झाले खाक अन्.....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

गँस सिलेंडर टाकीचा स्फोट झाला.सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

मुरगूड (कोल्हापूर) : सुरुपली (ता.कागल ) येथे ज्ञानदेव कृष्णा पाटील यांच्या राहत्या घरी स्वयंपाकाच्या गँस सिलेंडर टाकीचा स्फोट झाला.ही दुर्घटना सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.यात पाटील यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

अधिक माहिती अशी,
सुरुपली (ता.कागल ) येथील हनुमान गल्लीत  ज्ञानदेव कृष्णा पाटील यांचे शेतकरी कुटूंब राहते. आज सायकांळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाटील यांची पत्नी गॅसवर स्वयंपाक करत होती.यावेळी अचानकपणे गॅसने पेट घेतला.आणि क्षणाधार्थ टाकीचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला.गॅसच्या फुटलेल्या टाकीचे तुकडे सुमारे १०० फूटावर विखरुन पडले.तर सुमारे दोन किलोमीटरवर या स्फोटाचा भडका नागरीकांनी दिसला.आकाशात धुराचे लोट पसरले होते.या स्फोटानंतर लगेच जोराची आग भडकली.या आगीत ज्ञानदेव पाटील या गरीब शेतकऱ्यांचे घर त्यांच्या डोळ्यादेखत जळून खाक झाले.

हेही वाचा- महाराष्ट्रातील या शाळा होणार बंद  : राज्य शासनाचा निर्णय

सुरुपलीत गँस सिंलेंडर च्या टाकीचा स्फोट

या आगीत सर्व प्रापंचिक साहित्यांसह रोख १५ हजार रुपये,सोन्याच्या दोन अंगठ्या,भात,तसेच इतर धान्य जळून खाक झाले.स्फोट होताच गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला.पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने मंडलिक साखर कारखान्याच्या अग्नीशामक बंबाला पाचारण करण्यात आले. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले.पण या कुटूंबाचा संसार मात्र उध्दवस्थ झाला.त्यामुळे गरीब शेतकरी कुंटूंब उघडयावर पडले आहे. शासनाने या कुंटूबाला मदत करावी.अशी मागणी होत आहे.घटनास्थळी मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक विद्या जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
पाटील कुटुंबाचे हनुमान गल्लीत एका कोपऱ्यात घर आहे. ही आग लागल्यानंतरशेजारील घरांना ती लागली नसल्याने पुढील अनर्थ टळला.त्याचबरोबर या दुर्घटनेत सुदैवाने कसलीही जिवीत हानी झालेली नाही.
.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gas cylinder blast in surupali kolhapur district Destroy the house