बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा थाट कोल्हापुरात ;  मिळाला नवा लूक

girish satam and colleagues bike look amitabh bachchan vehicle marathi news
girish satam and colleagues bike look amitabh bachchan vehicle marathi news
Updated on

कोल्हापूर : बिग बी अमिताभ बच्चन म्हणजे अनेकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते. आजही त्यांच्यावर चित्रीत झालेली गाणी वाजताच पाय आपोआप थिरकतात. साहजिकच त्यांची प्रत्येक गोष्ट साऱ्यांनाच भुरळ घालते. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील ‘लॅंड क्रूझर एलसी २००’ ही गाडी फलटणच्या रघुनाथराजे नाईक- निंबाळकर यांच्याकडे सध्या आहे. नुकताच त्याला येथील गिरीश साटम आणि सहकाऱ्यांनी नवा लूक दिला आहे.

गिरीश साटम आणि सहकाऱ्यांनी दिला नवा लूक

साटम सांगतात, ‘‘अमिताभ बच्चन यांचे आम्हीही फॅन आहोत. त्यांनी सुमारे आठ वर्षे वापरलेली लॅंड क्रूझर ही गाडी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी घेतली आणि त्यानंतर तिला नवा लूक देण्यासाठी त्यांनी आम्हांला संधी दिली. यानिमित्ताने शाहूपुरीतील गॅरेजमध्ये सहा दिवस ही गाडी होती.  

साटम पेंटर्सच्या माध्यमातून आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. पेंटींग, सिरॅमिक कोटींग, इंटेरियर क्‍लिनिंग आदी कामे आमच्याकडे होतात. आजवर अनेक दिग्गजांच्या वाहनांना नवा लूक दिला; पण अमिताभ बच्चन आणि कुटुंबीयांनी वापरलेल्या गाडीला नवा लूक देण्याची संधी मिळाल्याचेही समाधान आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com