कोल्हापूर : देवकांडगावजवळ दीड लाखांची गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त 

goa made foreign liquor seized kolhapur gadhinglaj
goa made foreign liquor seized kolhapur gadhinglaj

गडहिंग्लज : देवकांडगाव (ता. आजरा) येथे एक लाख 36 हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची विदेशी दारु पकडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. दारुच्या बेकायदेशीर वाहतुकीसाठी वापरलेली एक चारचाकी व एक दुचाकाही जप्त केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. 

निव्हेल बाबतेस बारदेस्कर (वय 35, रा. सावर्डेकर कॉलनी मुरगूड, ता. कागल), मिल्टन जॉकी डिसोझा (वय 26, रा. भडगाव बुद्रूक, ता. कुडाळ, दोघेही सध्या रा. वाकीघोल मळा गावठाण, ता. राधानगरी) व विठ्ठल गोविंद पाटील (वय 35, रा. पाटील गल्ली कडगाव, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध दारुची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियोजन केले आहे. राज्याच्या हद्दीवर चेकपोस्ट उभारले आहेत. शिवाय गस्तही वाढविली आहे. दरम्यान, पथकाने देवकांडगावच्या हद्दीत पेरणोली-देवकांडगाव रोडवर संशयास्पद मारुती ओमिनी (एमएच 07, क्‍यू 3309) थांबविली. बारदेस्कर, पाटील या चारचाकीत होते. या चारचाकीची तपासणी केली असता बिअरचे 500 मिलीचे 144 सिलबंद टिन, काजू फेनीचे 180 मिलीच्या 48 बाटल्या, व्हिस्की व रमच्या 180 मिलीच्या 144 बाटल्या, 750 मिलीच्या 168 बाटल्या आढळून आल्या. त्या जप्त केल्या असून त्याची किंमत एक लाख 36 हजार 320 रुपये होते. या चारचाकीसह मिल्टनकडील हिरो होंडा सीबीझेड (एमएच 09, बीक्‍यू 9774) ही दुचाकीही जप्त केली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त वाय. एम. पोवार, अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज विभागाचे निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यम निरीक्षक जी. एन. गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक एस. आर. ठोंबरे, ए. टी. थोरात, ए. आर. जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. निरीक्षक श्री. गरुड अधिक तपास करीत आहेत.


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com