‘गोकुळ’मध्ये आबिटकरांचे ठरेना ;  सत्तारूढ गटाला मोठे खिंडार 

gokul election update atmosphere political marathi news
gokul election update atmosphere political marathi news
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) विद्यमान संचालक आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी विरोधी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठिंब्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न सुरू आहेत; पण आबिटकर यांचे मात्र अजून ठरेना. 

‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे पाच संचालक फुटल्याने सत्तारूढ गटाला मोठे खिंडार पडले आहे. शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विरोधी शाहू शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचे मतदार संघातील राजकीय विरोधक माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांचा पाठिंबा मिळवण्यात सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांना यश आले आहे. 

आबिटकर यांचीही स्थिती  सरूडकर यांच्यासारखी झाली आहे. विधानसभा मतदारसंघातील त्यांचे सर्व विरोधक विरोधी शाहू शेतकरी विकास आघाडीकडे असताना आपणही त्यात सहभागी होऊन भविष्यातील राजकीय अडचण ओढवून घ्यायची का,  या मानसिकतेत  आबिटकर आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय झालेला नाही. आज आमदार  पी. एन. पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क केला, त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे समजते. विरोधी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबईला गेल्याने  हालचाली थंड झाल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मात्र कोल्हापुरातच ठाण मांडले असून ठरावधारकांबरोबरच तालुक्‍यातील नेत्यांशी त्यांनी संपर्क कायम ठेवला आहे. 

 अर्जासाठी झुंबड 
या निवडणुकीसाठी २५ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दोन दिवसांत २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या तीन दिवसांपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुटीमुळे बंद आहे. मंगळवारपासून (ता. ३०) ती सुरू होत असून गुरुवार (ता. १ एप्रिल) हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आज मंगळवारीच अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्‍यता आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com